

नवी दिल्ली : मोबाईल फोन हा आता आपल्या दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये समाविष्ट झालेला आहे. मात्र, अनेकांना मोबाईलचा अतिरेकी वापर करण्याची सवय असते. रात्री झोपताना तसेच सकाळी उठताच त्यांना हातात मोबाईल हवा असतो. याबाबत तज्ज्ञांनी एक इशारा दिला आहे. सकाळी उठताच मोबाईल चेक करीत बसू नये, त्याचे दुष्परिणाम होतात, असे त्यांनी म्हटले आहे.
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे खूप महत्त्वाचे आहे. परंतु, जे लोक सकाळच्या वेळेस त्यांचे फोन तपासतात, त्यांच्या झोपेच्या गुणवत्तेवर नकारात्मक परिणाम होतात. खरे तर फोन स्क्रीनमधून बाहेर पडणारी किरणे मेलाटोनिन हार्मोन्सच्या निर्मितीमध्ये व्यत्यय आणतात. हे हार्मोन झोपेचे नियमन करण्यास मदत करते. सकाळच्या वेळेत मोबाईल फोन तपासताना अनेकदा नोटिफिकेशन्स, ई-मेल्स किंवा सोशल मीडिया अपडेटस्मुळे अनावश्यक ताणतणाव येत असतो. अशा परिस्थितीत तुमची नकारात्मकता वाढू शकते आणि त्यामुळे तुम्ही विनाकारण अस्वस्थ होऊ शकता.
हेही वाचा :