कोल्हापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी | पुढारी

कोल्हापूर परिसरात पावसाच्या हलक्या सरी

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा : गेल्या चार दिवसांतील प्रचंड उकाड्याने हैराण झालेल्या शहरवासीयांना बुधवारी रात्री पावसाच्या हलक्या सरींनी काहीसा सुखद गारवा दिला. सायंकाळनंतर शहर परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. बुधवारी दिवसभरात पारा 3 अंशांनी घसरून 32.9 अंशांवर आला, तर किमान तापमान 24.7 अंश सेल्सिअस होते.

सकाळपासूनच ढगाळ हवामान होते. त्यामुळे उकाडा प्रचंड वाढला. दुपारनंतर वारा सुटल्याने हवेत गारवा निर्माण झाला. सायंकाळनंतर पुन्हा वातावरणात बदल होऊन हलक्या पावसास सुरुवात झाली. रात्रीही पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर उकाड्याने हैराण झालेल्?या शहरवासीयांना सायंकाळनंतर पडलेल्या हलक्या पावसाने काहीसा सुखद गारवा लाभला. पावसामुळे शहरातील काही भागात काही काळ वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे नागरिकांची चांगलीच पंचाईत झाली.

Back to top button