शेतकर्‍यांना हमीभाव नाही, तर हमखास भाव मिळावा : मुख्यमंत्री | पुढारी

शेतकर्‍यांना हमीभाव नाही, तर हमखास भाव मिळावा : मुख्यमंत्री

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शेतकरी हे देशाचे खरेखुरे वैभव आहे. ‘अन्नदाता सुखी तर देश सुखी’ ही आमच्या सरकारची भूमिका आहे. आम्हाला शेती कळत नसली तरी शेतकर्‍यांचे अश्रू कळतात व ते पुसण्याचे काम करण्याला आम्ही प्राधान्य देत आहोत. यासाठीच आम्ही ‘पिकेल ते विकेल’ या अभियानाच्या माध्यमातून शेतकर्‍यांना हमीभाव नाही, तर हमखास भाव देण्याचा प्रयत्न करीत आहोत, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

कृषी विभागाच्या विविध पुरस्कारांचे वितरण प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरे यांनी दृकश्राव्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभाग घेतला. मुख्यमंत्री म्हणाले, कोरोना संकटात शेतकरी हेच देशाचे खरेखुरे वैभव असल्याचे दिसून आले. शेतकरी दुर्लक्षित राहिला, तर देशावर भूकबळीचे संकट ओढवेल, हे लक्षात घेतले पाहिजे. शेतकर्‍यांचे अश्रू पुसण्यासाठी सरकारमध्ये आल्यानंतर आम्ही सर्वांत प्रथम दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर कोरोना महामारीमुळे राज्याची परिस्थिती खालावली. मात्र, आता परिस्थिती सुधारत असून, लवकरच आम्ही नियमित कर्जदार शेतकर्‍यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन म्हणून देणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच ज्या मालाला मागणी आहे, अशीच पिके घेण्यासाठी कृषी विभागाकडून ‘पिकेल ते विकेल’ ही योजना राबवली जात आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांना केवळ हमीभाव नाही, तर हमखास भाव मिळाला पाहिजे, असे आमचे धोरण असल्याचेही त्यांनी आवर्जून सांगितले.

हेही वाचा :

Back to top button