फ्लोरिकल्चर : सुवासिक करिअरवाट | पुढारी

फ्लोरिकल्चर : सुवासिक करिअरवाट

जर तुम्हाला फुलांची आवड असेल तर करिअर म्हणून फ्लोरिकल्चर क्षेत्र (Floriculture area) अतिशय पूरक ठरू शकते. फ्लोरिकल्चर किंवा फुलांची शेती हे क्षेत्र आता लोकप्रिय ठरू लागले आहे.

रंगबिरंगी, सुवासिक फुलांची आवड नसणारा व्यक्ती सापडणे दुर्मीळच. घराची सजावट करायची असो किंवा पूजा असो, फुलांची अनिवार्यता असतेच. जगात आजघडीला फुलांच्या शेकडो जाती अस्तित्वात असून त्यांचे रूप आणि सुंगध पाहून आपण हरखून गेल्याशिवाय राहत नाही.

सर्वांचे लक्ष वेधून घेणारे फूल टवटवीत राहण्यासाठी, त्याचे उत्पादन वाढवण्यासाठी फ्लोरिकल्चरिस्ट मेहनत घेत असतो. ऊन-वारा-पाऊस यापासून बचाव करत बारा महिने ताजेपणा राखण्यासाठी फ्लोरिकल्चरिस्ट संशोधनही करत असतो. त्याच्या मेहनतीच्या जोरावरच बागबगीचा फुलांनी बहरलेल्या असतात. जर तुम्हाला फुलांची आवड असेल तर करिअर म्हणून फ्लोरिकल्चर क्षेत्र अतिशय पूरक ठरू शकते.

फ्लोरिकल्चर (Floriculture) किंवा फुलांची शेती हे क्षेत्र आता लोकप्रिय ठरू लागले आहे. फूलशेतीबाबत युवक आकर्षित होत असून यापासून रोजगाराची मोठी संधी मिळत आहे. विविध प्रकारच्या फुलांंचे रोप, कलम तयार करून ती विक्रीचा व्यवसाय देखील केला जातो. फुलांंची शेती ही वातावरणात केवळ सुगंध निर्माण करत नाही तर सौंदर्य प्रसाधनांची निर्मिती, गुलकंद यासाठीही उपयोग केला जातो. कॉस्मेटिक, परफ्यूम आणि फार्मास्युटिकल इंडस्ट्रीसाठी फूलशेतीला विशेष महत्त्व आहे.

फ्लोरिकल्चरलिस्ट हा फुलांंच्या रोपांची लागवड करून त्यांपासून सुंदर फुलांचे उत्पादन मिळवून ते विक्रीसाठी पाठवण्यापर्यंतच्या प्रक्रियेत महत्त्वाचा वाटा उचलतो. फ्लोरिकल्चरिस्ट हा बगीचातील फुलांची देखभाल करणे, निगा राखणे, खराब वातावरणात जपवणूक करणे यावर लक्ष केंद्रित करत असतात. याशिवाय ते फुलांच्या नवीन जातीही विकसित करण्यासाठी संशोधन करत असतात. तुम्हाला फूलशेतीमध्ये रस असेल तर फ्लोरिकल्चरिस्ट म्हणून करिअरची निवड करू शकता.

यासंदर्भातील अभ्यासक्रम असे. सर्टिफिकेट इन फ्लोरिकल्चर टेक्नॉलॉजी, डिप्लोमा इन फ्लोरिकल्चरल, बी.एस्सी. (फ्लोरिकल्चरल अँड लँडस्केपिंग) एम.एस्सी. (फ्लोरिकल्चरल बिझनेस मॅनेजमेंट) आणि फ्लोरिकल्चरल अँड लँडस्केपिंगमध्ये डॉक्टरेट पदवी मिळवू शकतात. फ्लोरिकल्चरिस्ट हा पदवी प्राप्त केल्यानंतर करिअरला सुरुवात करू शकतो. फ्लोरल इंडस्ट्रीमधील विविध पदांसाठी अर्ज करता येतो. फ्लोरल डिझायनर, प्रॉडक्शन मॅनेजर आणि विक्री प्रतिनिधी हे नर्सरी आणि गार्डन सेंटरमध्ये काम करतात. फ्लोरिकल्चरिंग मध्ये अधिक अनुभवी असणार्‍या उमेदवाराला खासगीबरोबर सरकारी क्षेत्रातही चांगल्या रोजगाराची संधी मिळू शकते.

जगदीश काळे

Back to top button