सावाना निवडणूक : ग्रंथालयभूषण पॅनलचे सर्व उमेदवार जाहीर | पुढारी

सावाना निवडणूक : ग्रंथालयभूषण पॅनलचे सर्व उमेदवार जाहीर

नाशिक : सार्वजनिक वाचनालय, नाशिक (सावाना) च्या 2022-2027 पंचवार्षिक निवडणुकीसाठी माघारीनंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले. ग्रंथालय भूषण पॅनलने अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदांच्या उमेदवारांची घोषणा आधीच केली होती. आता कार्यकारी मंडळाच्या उर्वरित 15 उमेदवारांची घोषणाही मंगळवारी रात्री उशिरा करण्यात आली. 8 मे रोजी ही निवडणूक होत आहे.

या पॅनेलमध्ये जुन्या आणि नवीन उमेदवारांचा सुरेख संगम आहे. सर्व क्षेत्रांतील दिग्गज लोकांचा त्यात समावेश आहे. मतदारांची पसंतीही या पॅनललाच असल्याने आमचे सर्व उमेदवार निश्चितच निवडून येतील व नवा इतिहास घडवतील, असा विश्वास पॅनलचे सूत्रधार प्रा. दिलीप फडके यांनी व्यक्त केला. या पॅलतर्फे अध्यक्षपदासाठी प्रा. दिलीप फडके आणि उपाध्यक्षपदासाठी प्रा. डॉ. सुनील कुटे व डॉ. विक्रांत जाधव हे उमेदवार आहेत. तर कार्यकारी मंडळाच्या 15 जागांसाठी  करंजकर संजय पांडुरंग, गायधनी सुरेश दत्तात्रय, जातेगांवकर जयप्रकाश रामकिसन, जाधव राजेन्द्र सुपडू, जोशी देवदत्त प्रभाकर, डॉ. बोडके धर्माजी जयराम, ॲड. बगदे अभिजीत मुकुंद, नातू गिरीश कृष्णराव, बर्वे जयेश शंकरराव, बेळे प्रेरणा धनंजय, मालपाठक मंगेश एकनाथ, मुंगी उदयकुमार दत्तात्रय, प्रा. मुठाळ सोमनाथ काशिनाथ, लोंढे शाम धोंडीराम आणि डॉ. शेजवळ राजेन्द्र त्र्यंबकराव हे उमेदवार पॅनलतर्फे रिंगणात आहेत. पॅनलच्या प्रचारास आधीच प्रारंभ झाला असून आता त्याला अधिक गती प्राप्त होणार आहे, असे प्रा.दिलीप फडके यांनी सांगितले.

  • सार्वजनिक वाचनालय, नाशिक पंचवार्षिक निवडणूक सन 2022-2027 साठी *ग्रंथ भूषण पॅनलची आज घोषणा करण्यात आली. या पॅनलचे उमेदवार पुढीलप्रमाणे :

अध्यक्ष – प्रा.फडके दिलीप बा.
उपाध्यक्ष – प्रा. डॉ. कुटे सुनील यादव
उपाध्यक्ष – डॉ.जाधव विक्रांत चंद्रकांत

कार्यकारी मंडळ सदस्य –
करंजकर संजय पांडुरंग
गायधनी सुरेश दत्तात्रय
जातेगांवकर जयप्रकाश रामकिसन
जाधव राजेन्द्र सुपडू
जोशी देवदत्त प्रभाकर
डॉ.बोडके धर्माजी जयराम
ॲड. बगदे अभिजीत मुकुंद
नातू गिरीश कृष्णराव
बर्वे जयेश शंकरराव
बेळे प्रेरणा धनंजय
मालपाठक मंगेश एकनाथ
मुंगी उदयकुमार दत्तात्रय
प्रा. मुठाळ सोमनाथ काशिनाथ
लोंढे शाम धोंडीराम
डॉ.शेजवळ राजेन्द्र त्रंबकराव

हेही वाचा :

Back to top button