नाशिक : जिल्ह्यातील ‘या’ सहा देवस्थानांना मिळाला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा | पुढारी

नाशिक : जिल्ह्यातील 'या' सहा देवस्थानांना मिळाला ‘ब’ वर्ग तिर्थक्षेत्राचा दर्जा

नाशिक (येवला) : पुढारी वृत्तसेवा
ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सहा देवस्थानांना ‘ब’ वर्ग प्राप्त झाला असून, त्यात येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान, सिन्नर तालुक्यातील नांदूरशिंगोटे येथील श्री रेणुकामाता मंदिर, देवळा तालुक्यातील उमराणे येथील श्री रामेश्वर मंदिर, निफाड तालुक्यातील साकोरे मिग येथील श्री खंडेराव महाराज मंदिर, सुकेणे येथील श्री दत्त मंदिर व पिंपळगाव बसवंत येथील श्रीराम मंदिर यांचा समावेश आहे.

जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या पाठपुराव्यातून हा दर्जा प्राप्त झाला असून, या दर्जामुळे संबंधित तीर्थक्षेत्रांच्या विकासकामांसाठी शासनाकडून अधिक निधी प्राप्त होऊ शकणार आहे. त्यातून या देवस्थानांना येणार्‍या भाविकांना चांगल्या सुविधा मिळू शकणार आहेत.

येवला तालुक्यातील कोटमगाव येथील श्री जगदंबा देवस्थान प्रसिद्ध असून, ना. भुजबळ यांच्या माध्यमातून त्याचा विकास करण्यात आला आहे. तेथे राज्यभरातील भाविक येत असतात. त्यांना अधिक सुविधा मिळाव्यात, यासाठी पाठपुरावा सुरू होता.
या दर्जामुळे भाविकांत वाढ होणार असून, अर्थकारणालाही गती येणार आहे. याशिवाय अन्य पाच देवस्थानांमध्येही विकासकामे होऊ शकणार आहेत.

काय आहेत
निकष?
जिल्हा पोलिस यंत्रणेकडून मिळत असलेल्या माहितीनुसार, तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणी दररोज 1,500 ते 2,000 भाविक येतात तसेच यात्रा / उत्सवाच्या वेळी चार लाख किंवा त्याहून अधिक भाविक येतात, अशी सर्व तीर्थक्षेत्रे ‘ब’ वर्गास पात्र होतात.

हेही वाचा :

Back to top button