धुळे : आश्रमशाळेत अध्यक्ष भासवून बनावट पदभरती | पुढारी

धुळे : आश्रमशाळेत अध्यक्ष भासवून बनावट पदभरती

धुळे (पिंपळनेर): पुढारी वृत्तसेवा : आदिवासी अनुदानित आश्रमशाळेत परस्पर पदभरती करत शासनासह संस्थेची फसवणूक करणार्‍या विश्वस्तावर पिंपळनेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

येथील साक्री तालुका आदिवासी सेवा मंडळ या संस्थेचे विश्वस्त शिवाजी जगन्नाथ थानक (७५, रा. वर्धाने, ता. साक्री) यांच्या फिर्यादीनुसार, संस्थेचे इतर विश्वस्त मंगलदास नंदलाल भवरे (७०, रा. मळगाव, पोलिस वसाहत, ता. साक्री) याने संस्थेचा अध्यक्ष असल्याचे भासविण्यासाठी अधिकारबाह्य बनावट लेटरपॅड व संस्थेचे बनावट शिक्के वापरून सर्व बनावट कागदपत्रे तयार केली. संस्थेच्या डांगशिरवाडे येथील अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत उत्तम निमजी मावची व दिनेश दिलीप राऊत यांना माध्यमिक शिक्षक, तर धनंजय लोटन सोनवणे यांना शिपाई, महेंद्र भीमसिंग वसावे यांना कामाठी म्हणून संस्थेमध्ये बनावट नियुक्त पदभरती करुन घेतली. शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी संशयितांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा:

Back to top button