पिंपरी : महापालिका करणार संकेतस्थळ अपडेट | पुढारी

पिंपरी : महापालिका करणार संकेतस्थळ अपडेट

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे www.pcmcindia.gov.in हे संकेतस्थळ अद्याावत करण्यात येणार आहे. तसेच, संकेतस्थळ देखभाल करण्यासाठी 12 लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यास आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांनी मंजुरी दिली आहे.

पालिकेच्या संकेतस्थळावर पालिकेसंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध आहेत. तसेच, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, विभागप्रमुख, क्षेत्रीय अधिकारी यांचे नाव व संपर्क क्रमांकाची माहिती आहे.

कोरोना मृत्यूचे सानुग्रह अनुदान देण्यासंबंधी कालमर्यादा निश्चित !

तसेच, पालिकेच्या सर्व कार्यालयाची माहिती व पत्ते उपलब्ध आहेत. पालिकेच्या नागरीवस्ती विकास योजना विभागाच्या वतीने राबविण्यात येणार्‍या विविध कल्याणकारी योजनेची माहिती देण्यात आली आहे. कोरोनावर उपचार करणारे रुग्णालय आणि उपलब्ध बेड आदींची माहितीही त्यावर दिली जाते.

संकेतस्थळ मेन्टेनन्स, होस्टींग व दुरूस्ती कामासाठी पालिकेने निविदा प्रक्रिया राबविली होती. त्यात दिमाख कन्सटंट प्रा. लि.ची 33.61 टक्के कमी दराची निविदा पात्र ठरली. त्यानुसार ते कामाचा वर्षभरासाठी 11 लाख 95 लाख खर्च आहे. त्यास स्थायी समिती सभेत आयुक्त पाटील यांनी मंजुरी दिली.

गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलीसही उचलण्याच्या तयारीत; ताबा मिळवण्यासाठी मुंबईत तळ ठोकला

दरम्यान, पालिकेच्या प्रायमरी डाटा सेंटरचे काम टेक नाईन सर्व्हिसेस करीत आहे. त्यांना दोन महिने मुदतावाढ देण्यात येणार आहे. त्यासाठी वाढीव 8 लाख 31 हजार 100 रुपये खर्च येणार आहे. त्यास आयुक्त पाटील यांनी मान्यता दिली आहे.

 

Back to top button