पिंपरी : कचरा डेपोत साकारतोय वेस्ट टू एनर्जी, बायोसीएनजी प्रकल्प | पुढारी

पिंपरी : कचरा डेपोत साकारतोय वेस्ट टू एनर्जी, बायोसीएनजी प्रकल्प

पिंपरी : नंदकुमार सातुर्डेकर : कचरा व्यवस्थापनाचे पिंपरी चिंचवड महापालिकेने चांगलेच मनावर घेतले आहे. मोशी कचरा डेपोत वेस्ट टू एनर्जी प्रकल्प व हॉटेल वेस्ट पासून बायोसीएनजी प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. हे काम अनुक्रमे फेब्रुवारी व डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड शहर हे झपाट्याने वाढत आहे. शहराची लोकसंख्या 25 लाखांवर गेली आहे. शहरात रोज अकराशे टन कचरा निर्माण होतो. त्यासाठी मोशीत प्रोसेसिंग मेकॅनिकल कंपोस्टिंग प्लांट आहे.

500 ते 600 टन कचर्‍याचा कंपोस्टिंग प्लान्ट आहे. ओला व सुका कचरा वेगळा केला जातो. मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटीमध्ये एक हजार टन कचर्‍याचे व्यवस्थापन होते.

कोरोना मृत्यूचे सानुग्रह अनुदान देण्यासंबंधी कालमर्यादा निश्चित !

ओल्या कचर्‍याचे कंपोस्ट केले जाते यातील प्लास्टिक बॉटल, रबर कमर्शिअल व्हॅल्यू असलेला कचरा रिसायकलसाठी वेगळा काढला जातो. बाकी वेस्ट टू एनर्जीमध्ये टाकला जाणार आहे.

त्याची रोज 700 टन क्षमता आहे. त्या पासून रोज 14 मेगावॅट वीज मिळणार आहे. जानेवारी फेब्रुवारीपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होईल असे सांगितले जात आहे.

यापैकी दोन मेगावॅट वीज प्लांट चालवायला लागेल. महापालिकेला पाच रुपये प्रति युनिट प्रमाणे बारा मेगावॅट वीज उपलब्ध होणार आहे. वीस वर्ष महापालिकेलाही वीज मिळणार असल्याने महापालिकेचे 35 ते 40 टक्के इलेक्ट्रिक बिल वाचणार आहे.

गुणरत्न सदावर्तेंना सातारा पोलीसही उचलण्याच्या तयारीत; ताबा मिळवण्यासाठी मुंबईत तळ ठोकला

सध्या मोशीमध्ये 70 ते 80 टक्के कचरा ओला व सुका असा वेगळा होऊन येतो. ओला व सुका कचरा मोशी कचरा डेपोत वेगळा आल्यास ओला कचरा कंपोस्टला देता येतो.

कचरा डेपोवरचा ताण त्यामुळे कमी होईल हॉटेल वेस्ट पासून बायो सीएनजी प्लांट उभारण्याचे काम सुरू आहे. डिसेंबरपर्यंत हा प्रकल्प सुरू होईल. त्याची क्षमता रोज 50 टन इतकी आहे.

रोज निर्माण होणारा कचरा 1100 टन
कंपोस्टिंग प्लांट 500 ते 600 टन
मटेरियल रिकव्हरी फॅसिलिटी 1000 टन
वेस्ट टू एनर्जी (नियोजित) 700 टन
बायोसीएनजी (नियोजित) क्षमता रोज 50 टन

मुंबई :आता काळाचौकी पोलिस ठाण्यात पाणी तुंबणार नाही !

“शहरात रोज 1100 टन कचरा निर्माण होतो. कचरा व्यवस्थापनासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. वेस्ट टू एनर्जी प्रकल्प जानेवारी-फेब्रुवारीमध्ये तर हॉटेल वेस्ट पासून बायोसीएनजी प्रकल्प डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल. सुका व ओला कचरा वेगळा आल्यास ओला कचरा कंपोस्टिंगला देता येईल. कचरा डेपोवरचा ताण कमी होईल. त्यासाठी नागरिकांनी कचरा अलगीकरण करून मगच घंटा गाडीत टाकावा, असे आमचे आवाहन आहे.”
-संजय कुलकर्णी , पर्यावरण विभाग ,सह शहर अभियंता, पिंपरी चिंचवड महापालिका

Back to top button