LokSabha Elections | भोर-राजगड-मुळशीच्या पुणेकर रहिवाशांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा! | पुढारी

LokSabha Elections | भोर-राजगड-मुळशीच्या पुणेकर रहिवाशांचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा!

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : भोर व राजगड (वेल्हे), मुळशी तालुक्यातील पुण्यातील रहिवाशांनी बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आंबेगाव बुद्रुक (ता. हवेली) येथे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) व महायुतीच्या वतीने आयोजित भोर-राजगड-मुळशीच्या रहिवासी मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मार्गदर्शन केले. उपमुख्यमंत्र्यांनी दोन्ही तालुक्यांतील रहिवाशांना आगामी निवडणुकीत सुनेत्रा पवार यांना मतदान करण्याचे आवाहन केले.

या वेळी उपस्थित भोर व राजगडकरांनी या आवाहनाला मोठा प्रतिसाद देत सुनेत्रा पवार यांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा भोर-राजगड रहिवाशांच्या वतीने पुणे जिल्हा दूध संघाचे चेअरमन भगवान पासलकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या वेळी भगवान पासलकर यांनी राजगड तालुक्यातील पाबे बोगदा, सिंहगड भागात शेतीसिंचन योजना आदींची मागणी केली. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, रांजणे- खामगावसह राजगड, भोर तालुक्यातील टंचाईग्रस्त भागात शेतीसिंचन योजना राबविण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे तसेच पाबे बोगदा करण्यासाठी प्रयत्न करणार आहे. या वेळी जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष भगवान पासलकर, जिल्हा बँकेच्या संचालिका निर्मला जागडे, रणजित शिवतारे, विक्रम खुटवड, भालचंद्र जगताप, आप्पा रेणुसे, कुलदीप कोंडे, किरण राऊत, आनंद देशमाने, सुनील शेंडकर आदी उपस्थित होते.

हेही वाचा

Back to top button