नाशिक : शालिमारला दोघांमध्ये तुफान हाणामारी | पुढारी

नाशिक : शालिमारला दोघांमध्ये तुफान हाणामारी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा : कुरापत काढून दोघांनी एकमेकांस मारहाण केल्याची घटना शालिमार येथील कालिदास कलामंदिरासमोर घडली.

या हल्ल्यात गोकुळ ऊर्फ रोहित ब्रिजलाल केशरवाणी (२१, रा. शिवशक्ती चौक, सिडको) व सचिन पवन अहिरे (२१, रा. अशोकनगर, सातपूर) हे दोघे जखमी झाले आहेत. शनिवारी (दि.२) सायंकाळी ५ च्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकरणी भद्रकाली पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा :

Back to top button