जळगाव : मध्यरात्री महिलेचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक | पुढारी

जळगाव : मध्यरात्री महिलेचा विनयभंग करणाऱ्या संशयिताला अटक

जळगाव पुढारी वृत्तसेवा : शहरातील एका भागात राहणाऱ्या महिलेचा विनयभंग करून मारहाण केल्याची घटना घडली आहे. यातील संशयित आरोपीला पोलीसांनी अटक केली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील एका भागात ३२ वर्षीय महिला आपल्या कुटुंबियांसह वास्तव्याला आहे. त्या खासगी कंपनीत नोकरीला आहेत. ३० मार्च रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव याने महिलेच्या घराचा दरवाजा ठोठावला. महिला दरवाजा उघडून बाहेर आल्या असता मंगलसिंग याने तिचा हात पकडला व तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून तिचा विनयभंग केला. यात महिलेने त्याला ढकलले याचा राग आल्याने मंगलसिंग जाधव याने महिलेला लाथ मारून पळ काढला.

याप्रकरणी महिलेच्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मंगलसिंग ज्ञानेश्वर जाधव याच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, दत्तात्रय बडगुजर, सतीश गरजे यांनी अटक केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक जगदाळे करीत आहे.

हेही वाचा :

Back to top button