मोठी बातमी! PAN-Aadhaar Link करण्यासाठी ‘एवढा’ बसणार भुर्दंड | पुढारी

मोठी बातमी! PAN-Aadhaar Link करण्यासाठी ‘एवढा’ बसणार भुर्दंड

पुढारी ऑनलाईन डेस्क : ज्यांनी अद्याप आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक (PAN-Aadhaar Link) केलेले नाही, त्यांच्यासाठी एक चांगली आणि वाईट बातमी आहे. चांगली बातमी म्हणजे सरकारने आता पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम मुदत वाढवली आहे, पण त्याचबरोबर एक अटही घातली आहे, जी तुमच्या खिशाला भारी पडेल.

सरकारकारकडून मुदत वाढ..

जर तुम्ही पॅन-आधार लिंक (PAN-Aadhaar Link) केले नसेल, तर आता तुम्हाला हे काम करण्यासाठी पूर्ण वर्ष मिळेल. सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्याची अंतिम तारीख 31 मार्च 2023 पर्यंत वाढवली आहे. आयकर विभागाची धोरणे बनवणारी संस्था सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस (CBDT)ने देखील पॅन-आधार लिंक करण्याची अंतिम तारीख वाढवण्याची अधिसूचना जारी केली आहे. याआधीही सरकारने पॅन-आधार लिंक करण्याची मुदत चार वेळा वाढवली आहे.

…पण आता ही सेवा मोफत मिळणार नाही

CBDT ने पॅन कार्डसोबत आधार लिंक (PAN-Aadhaar Link) करण्याची शेवटची तारीख वाढवली आहे, पण आधार-पॅन लिंक करण्याच्या कामासाठी 500 रुपये शुल्कही लागू केले आहे. तर आतापर्यंत हे काम मोफत होत होते. म्हणजेच 31 मार्च 2022 पर्यंत आधार-पॅन लिंक झाले नाही तरी पुढील एक वर्ष कोणत्याही अडचणीशिवाय पॅन कार्ड काम करत राहील. पण दरम्यान, आधार-पॅन लिंक करण्यासाठी तुम्हाला 500 रुपये द्यावे लागतील. या नवीन अटीनुसार, 1 एप्रिल 2022 ते 30 जून 2022 दरम्यान, तुमचा पॅन-आधार लिंक करण्यासाठी 500 रुपये शुल्क भरावे लागेल आणि त्यानंतर या कामासाठी 1,000 रुपये शुल्क भरावे लागेल.

Back to top button