नाशिक : पोषण आहार तांदुळ घोटाळ्याच्या अंतिम अहवालात काय ? सगळ्यांच्याच नजरा | पुढारी

नाशिक : पोषण आहार तांदुळ घोटाळ्याच्या अंतिम अहवालात काय ? सगळ्यांच्याच नजरा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पोषण आहाराचा तांदूळ दडवून घोटाळा केल्याप्रकरणी राज्याच्या शिक्षण विभागाने नियुक्त केलेल्या चारसदस्यीय समितीचा अहवाल मंगळवारी (दि.15) रात्री पूर्ण झाला असून, बुधवारी (दि.16) अहवाल अंतिम करून गुरुवारी (दि.17) शिक्षण संचालकांकडे अहवाल पाठवला जाणार आहेत. तसेच विधिमंंडळाकडे देखील प्रत सादर केली जाणार आहे.

यामुळे अहवालात काय नमूद केले आहे याकडे नजरा लागल्या असून, संबंधित ठेकेदारांवर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. सेंट्रल किचन योजनेंतर्गत 13 ठेकेदारांचे शेड व गोदाम तपासणीसाठी शासनाचे पथक मागील महिन्यात नाशिकला आले होते. या तपासणीत पथकाला हिरावाडी येथील स्वामी विवेकानंद बचतगटाच्या गोदामात 14 हजार किलो शासनामार्फत दिलेला पोषण आहाराचा तांदूळ दडवून ठेवल्याचे आढळून आले होते.

या प्रकरणी शिक्षणाधिकारी धनगर यांनी पंचनामा केला. त्यात, अनेक गंभीर बाबी उघड झाल्यामुळे त्यांनी पोषण आहार विभागाच्या शिक्षण संचालकांना अहवाल पाठवला. त्यानुसार चारसदस्यीय समिती चौकशीसाठी गठीत करण्यात आली होती. समितीने चौकशी पूर्ण केली असून, चौकशी समितीकडून अहवाल तयार करण्यात आला आहे.
भाजप आमदार राम सातपुते यांनी संबंधित प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी करणारी लक्षवेधी दाखल केली आहे. त्यावर दोन दिवसांत शिक्षण विभागाला अहवाल देण्याचे सूचित केले होते. त्यानुसार शिक्षणाधिकारी धनगर यांनी अहवाल शासनाला पाठवला आहे.

हेही वाचा :

Back to top button