वाचा आजचं राशिभविष्य : या राशिच्या व्यक्तींना सुवार्ता ऐकायला मिळेल | पुढारी

वाचा आजचं राशिभविष्य : या राशिच्या व्यक्तींना सुवार्ता ऐकायला मिळेल

राशिभविष्य

राशिभविष्य
मेष

मेष- दिलेला शब्द पाळा. प्रेम प्रकरणात अडचणी येण्याची संभावना. संयम आवश्यक आहे. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे.
राशिभविष्य
वृषभ

वृषभ-कौटुंबिक कलह टाळावा. प्रत्येकाचे मत जाणून निर्णय घ्यावा. संतुलन साधणे महत्त्वाचे. अनावश्यक भीती निर्माण होईल. प्रवासाचे योग.
राशिभविष्य
मिथुन

मिथुन-बौद्धिक क्षमता वाढेल. मनासारखी खरेदी होईल. कला-गुणांना वाव मिळेल. मित्रमंडळींचा सहवास लाभेल. कलाकारांना प्रोत्साहन मिळेल.
राशिभविष्य
कर्क

कर्क-मानसिक संतुलन साधणे महत्त्वाचे आहे. आर्थिकद़ृष्ट्या प्रतिकूल दिवस. परिश्रम घेणे आवश्यक. कौटुंबिक समस्या निर्माण होतील.
राशिभविष्य
सिंह

सिंह-ठरवलेल्या कामात यश मिळेल. ईष्ट ते साध्य होईल. आनंददायी दिवस. जुन्या मित्रमंडळींची भेट होईल. प्रसन्नता लाभेल. खरेदीचा दिवस.
राशिभविष्य
कन्या

कन्या-खर्चावर नियंत्रण ठेवा. ईर्ष्या, स्पर्धा करू नका. त्यामुळे मनःस्ताप होण्याची शक्यता आहे. मनाविरुद्ध घटना घडतील.
राशिभविष्य
तुळ

तूळ-अनेक दिवसांचे स्वप्न पूर्ण होईल. सुवार्ता ऐकायला मिळेल. प्रवासाचे योग. प्रेम प्रकरणे मार्गी लागतील. वैवाहिक सौख्य उत्तम राहील.
राशिभविष्य
वृश्चिक

वृश्चिक- मनासारख्या घटना घडतील. कौतुकास्पद कार्य कराल. लोकांना सहकार्य कराल. जोडीदाराची साथ लाभेल.
राशिभविष्य
धनु

धनु-नियमित व्यायाम व योग साधनेची गरज. अनावश्यक गोष्टींना प्राधान्य देऊ नका. सरकारी कामांत अडचणी येतील.
राशिभविष्य
मकर

मकर-वादविवादात पडू नका. चूक मान्य करावी लागेल. सामंजस्याने विषय सोडवा. श्वसनासंबंधित आजार उद्भवतील. अशक्तपणा जाणवेल.
राशिभविष्य
कुंभ

कुंभ-आर्थिक परिस्थिती सुधारेल. प्रगतीच्या दिशेने वाटचाल कराल. छोटे प्रवास घडतील. भागीदारीतील व्यावसायिकांना लाभदायक दिवस ठरेल.
राशिभविष्य
मीन

मीन-योग्य दिशा व अचूक निर्णयामुळे कार्यसिद्धी योग. जवळच्या मित्रांचे सहकार्य लाभेल. शत्रू पीडा कमी होईल. पदोन्नतीचे योग.

– पं. प्रसाद जोशी

राशिभविष्य

Back to top button