जळगाव : बारावीच्या परीक्षेला ८११ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती | पुढारी

जळगाव : बारावीच्या परीक्षेला ८११ विद्यार्थ्यांची अनुपस्थिती

जळगाव ; पुढारी वृत्‍तसेवा बारावी परीक्षांना आजपासून प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी इंग्रजीच्या पेपरला 811 विद्यार्थ्यांची अनुपस्थिती राहिली. परीक्षे दरम्‍यान जिल्ह्यात एकही कारवाई झाली नाही.

कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण सुरू असताना कोरोनाचे सावट काहीसे सावरल्‍याने 4 मार्चपासून बारावीच्या ऑफलाईन परीक्षांना प्रारंभ झाला. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. जिल्ह्यातील 282 केंद्रांवर परीक्षा घेण्यात आली. जिल्ह्यातील 48 हजार 603 विद्यार्थ्यांनी बारावीच्या पेपरसाठी नोंद केलेली आहे, मात्र प्रत्यक्षात 47 हजार 792 विद्यार्थ्यांनी परीक्षेला हजेरी लावली. आजच्या इंग्रजीच्या पहिल्या पेपरला 811 विद्यार्थ्यांची अनुपस्थिती होती.

परीक्षेवेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. कॉफी सारखे प्रकार होऊ नयेत म्हणून जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षणाधिकारी यांच्या पथकाची नियुक्ती केली होती. त्यांनी आपल्या तालुक्यात भेटी दिल्या होत्या.

चोपडा तालुक्यात प्राथमिक शिक्षण अधिकारी विकास पाटील, चाळीसगाव तालुक्यात माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर नितीन चव्हाण, भुसावळ तालुक्यात शिक्षणाधिकारी निरंतर डॉक्टर डी एम देवांग जळगाव तालुका प्राचार्य डॉक्टर अनिल झोपे यांच्या पथकांनी आपापल्या तालुक्यात भेटी दिल्या. तसेच गटशिक्षणाधिकारी यांच्यातर्फे बैठे पथक प्रत्येक केंद्रावर नियुक्त करण्यात आले होते.

Back to top button