पुढारी ऑनलाईन डेस्क : ऑस्ट्रेलियाचा माजी दिग्गज लेगस्पिनर शेन वॉर्नचे निधन झाले. फॉक्स न्यूजनुसार, हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचा मृत्यू झाला. ५२ व्या वर्षीय त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वॉर्न हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने 145 टेस्ट मॅचमध्ये 708 विकेट्स घेतल्या आहेत. एकदिवसीय सामन्यात त्याने 293 विकेट घेतल्या. वॉर्न हे कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी घेणा-या गोलंदाजांच्या यादीत श्रीलंकेच्या मुथ्यय्या मुरली धरन नंतर दुस-या क्रमांकावर आहेत.
शेन वॉर्नने 1992 मध्ये भारताविरुद्धच्या सिडनी कसोटीतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. जानेवारी 2007 मध्ये त्यांनी सिडनीमध्येच इंग्लंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.