..अन्यथा खा. संभाजीराजेंना मुख्यमंत्रिपदी बसवून आरक्षण मिळवू ; मालेगावी मराठा मोर्चाच्या सभेत इशारा | पुढारी

..अन्यथा खा. संभाजीराजेंना मुख्यमंत्रिपदी बसवून आरक्षण मिळवू ; मालेगावी मराठा मोर्चाच्या सभेत इशारा

मालेगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
मराठा समाजाच्या मागण्यांना पाठिंबा देण्यास मराठा आमदार, खासदार, मंत्र्यांना बंधने असतील, आरक्षणासाठी कोणाचे मन दुखवू नये असे वाटत असेल, तर त्यांनी सरसकट राजीनामे द्यावेत. मराठा क्रांती मोर्चा स्वबळावर निवडणुका लढवून खासदार संभाजीराजे यांना मुख्यमंत्रिपदी बसवून आरक्षण मिळवू, असे नाशिक जिल्हा कृषीऔद्यागिक सहकारी संघाचे चेअरमन डॉ. अद्वय हिरे यांनी ठणकावले.

मराठा क्रांती मोर्चाची सोयगावमधील भाग्यलक्ष्मी मंगल कार्यालयात गुरुवारी (दि.24) सहविचार सभा पार पडली. त्यात ते बोलत होते. सकल मराठा समाजाच्या आरक्षणासह प्रमुख मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे हे येत्या 26 तारखेपासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषणास बसणार आहेत. त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वपक्षीय मराठा समाजाचे खासदार, आमदार, केंद्र व राज्यातील मंत्र्यांनी उपस्थित राहून मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात अन्यथा आपापल्या पदांचा राजीनामा द्यावा, असे आवाहन डॉ. हिरे यांनी यावेळी केले.

योवळी काँग्रेसचे प्रसाद हिरे, प्रसाद खैरनार, दादा जाधव, अनिल पाटील, प्रा. जगदीश खैरनार, खगेश देसले, पवन ठाकरे, अमोल निकम, संदीप पाटील, भाजप तालुकाध्यक्ष नीलेश कचवे आदींनी मार्गदर्शन केले. सभेस भाजप गटनेते सुनील गायकवाड, देवा पाटील, पंचायत समिती सदस्य अरुण पाटील, भारत पाटील, रामदास सूर्यवंशी, रवि सूर्यवंशी, रवि मोरे, अनिल पाटील, चंदू शेलार, गणेश सोनवणे, मनोहर बच्छाव, आर. के. बच्छाव, नगरसेवक अ‍ॅड. गिरीश बोरसे, डॉ. राजेंद्र ठाकरे, विनोद बोरसे आदींसह समाजबांधव उपस्थित होते.

तर चक्काजाम आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांना उपोषणास बसावे लागणे, ही समाजाच्या लोकप्रतिनिधींसाठी लाजीरवाणी बाब आहे. याचा जाब विचारण्यासाठी समाजबांधवांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, 27 तारखेपर्यंत ठोस निर्णय न झाल्यास 28 तारखेपासून राज्यात चक्काजाम आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

हेही वाचा :

Back to top button