नाशिक : नानासाहेबांचा मोबाइल फेकला ठाणे जिल्ह्यातील खाडीत, शोध लागेना | पुढारी

नाशिक : नानासाहेबांचा मोबाइल फेकला ठाणे जिल्ह्यातील खाडीत, शोध लागेना

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
नानासाहेब कापडणीस व डॉ. अमित कापडणीस या पिता-पुत्राचा खून केल्यानंतर संशयित राहुल जगतापने नानासाहेबांचा मोबाइल वापरून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार केले. त्यानंतर राहुलने त्यांच्या मोबाइलची विल्हेवाट ठाणे जिल्ह्यातील खाडीत केल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पोलिसांनी बुधवारी (दि.23) राहुलसोबत ठाणे येथील घटनास्थळ गाठले. मात्र, त्यांना मोबाइल आढळून आला नसल्याचे समजते.

दुहेरी खून केल्यानंतर राहुलने नानासाहेब यांचा मोबाइल वापरून 97 लाख रुपयांचे शेअर्स विक्री केले. त्यानंतर त्याच मोबाइलवरून इतर आर्थिक व्यवहारही केल्याचे पोलिस तपासात उघड झाले. राहुलला अटक केल्यानंतर अनेक घटना उघडकीस आल्या. त्यामुळे या गुन्ह्यातील तपासासाठी नानासाहेब यांचा मोबाइल आवश्यक असल्याने सरकारवाडा पोलिसांनी त्याच्याकडे मोबाइलची चौकशी केली. त्यावेळी त्याने ठाणे जिल्ह्यातील समुद्रातील खाडीत मोबाइल फेकल्याचे सांगितल्याचे समजते.

हेही वाचा :

Back to top button