ब्रेकिंग : नेपाळमध्‍ये ‘प्रचंड’ सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव

नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड.
नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड.
Published on
Updated on

पुढारी ऑनलाइंन डेस्‍क : नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल उर्फ प्रचंड यांनी आज (दि.२०) विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे, असे वृत्त ANIने दिले आहे. मागील आठवड्यात जनता समाजवादी पक्षाने (जेएसपी)पाठिंबा काढून घेतल्‍याने दहल यांचे सरकार अडचणीत आले होते. दीड वर्षांमध्‍ये प्रचंड सरकार हे चौथ्यांदा बहुमत चाचणीला सामोरे जावे लागले आहे.

दीड वर्षांमध्‍ये चौथ्यांदा विश्वासदर्शक ठराव

डिसेंबर २०२२ मध्ये पुष्प कमल दहल यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर त्यांनी चौथ्यांदा सभागृहात विश्वासदर्शक ठराव जिंकला आहे. प्रंचड यांनी नेपाळी काँग्रेसपासून फारकत घेतली आणि नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाशी (युनिफाइड मार्क्सिस्ट-लेनिनिस्ट) नवीन युती केली. नेपाळच्या राज्यघटनेनुसार, कोणत्याही मित्र पक्षाने सत्ताधारी आघाडीचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर पंतप्रधानांना विश्वासाचे मत घ्यावे लागते. अशा परिस्थितीत सोमवारी नेपाळी संसदेत विश्वासदर्शक ठरावावर मतदान झाले.


नेपाळच्या शक्तिशाली सरकारमध्ये सहयोगी असलेल्या अनेक पक्षांनी एकामागून एक पाठिंबा काढून घेतला होता. त्यामुळे प्रचंड सरकार अडचणीत आले होते. सरकारला विश्वासदर्शक ठराव जिंकण्यासाठी 275 सदस्यीय प्रतिनिधीगृहात किमान 138 मतांची गरज होती.

157 सदस्यांचा सरकारला पाठिंबा, प्रमुख विरोधी पक्षाचा मतदानावर बहिष्‍कार

सोमवारी विश्वासदर्शक ठरावाला नेपाळच्या 275 सदस्यीय प्रतिनिधीगृहातील 157 सदस्यांचा पाठिंबा प्रचंड यांना मिळाला. सीपीएन (माओवादी केंद्र) हा प्रतिनिधीगृहातील तिसरा सर्वात मोठा पक्ष आहे. त्यांना नेपाळच्या कम्युनिस्ट पक्षाचाही पाठिंबा मिळाला. एकूण 158 खासदारांनी मतदानात भाग घेतला. प्रमुख विरोधी पक्ष नेपाळी काँग्रेसने मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकला. तर 'एचओआर'च्या एका सदस्याने तटस्‍थ भूमिका  घेतली.

काय सांगते नेपाळची घटना ?

नेपाळच्‍या राज्‍यघटनेतील कलम 100 कलम 2 नुसार, पंतप्रधान ज्या पक्षाचे प्रतिनिधित्व करत असतील त्या पक्षाचे विभाजन झाल्यास किंवा आघाडी सरकारमधील कोणत्याही सदस्याने पाठिंबा काढून घेतल्यास त्‍यांना ३0 दिवसांच्या आत विश्वासदर्शक ठराव मांडावा लागेल. जनता समाजवादी पक्षाने (जेएसपी) गेल्या आठवड्यात युतीशी संबंध तोडून सरकारचा पाठिंबा काढून घेतला होता. 25 डिसेंबर 2022 रोजी सर्वोच्च कार्यकारी पद स्वीकारल्यानंतर दीड वर्षात विश्वासदर्शक ठराव मागण्याची पंतप्रधान प्रचंड यांची ही चौथी वेळ होती.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news