वणी : गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत आढळला मृतदेह, आकस्मिक मृत्यूची नोंद | पुढारी

वणी : गवताच्या गंजीला लागलेल्या आगीत आढळला मृतदेह, आकस्मिक मृत्यूची नोंद

वणी पुढारी वृत्तसेवा :
वणी येथील लक्ष्मीनगरच्या जवळ असलेल्या शेतात गवताच्या गंजीला लागलेल्या आगीतून एकाचा मृतदेह पोलिसांनी बाहेर काढला आहे. लागलेल्या आगीत जळून या व्यक्तीचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, अद्याप ठोस कारण स्पष्ट होऊ शकलेले नसून, पोलिस तपास करत आहेत.

रात्री आठच्या सुमारास ही घटना घडली. मनोहर पुंडलीक पवार (वय ५४) रा. वणी यांचा या आगीत जळून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे.

मनोहर पुंडलिक पवार (54) यांचा मृतदेह लागलेल्या आगीतून पोलिसांनी बाहेर काढला आहे.

आग लागल्याची बातमी कळताच वणी ठाण्याचे सपोनि. स्वप्निल राजपुत यांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. काही वेळात पोहचताच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. गवताच्या गंज्या वाळलेल्या असल्याने पेट घेतला होता. दरम्यान पोलिसांनी या आगीतून मृतदेह बाहेर काढला. वणी पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वणी पोलिस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा :

Back to top button