पुणे : हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा प्रयत्न : जयंत पाटील | पुढारी

पुणे : हा विरोधकांना नामोहरम करण्याचा भाजपचा प्रयत्न : जयंत पाटील

इंदापूर : पुढारी वृत्तसेवा

न्यायालयाने निर्णय दिलाय त्याबद्दल बोलणे योग्य नाही. कोणतेही कारण न देता इडीसारखी संस्था राज्यातील मंत्र्यांना घेऊन जाते आणि अटक दाखवते. वेगवेगळ्या अतिरेकी संघटनाचा उल्लेख करण्याचा प्रयत्न केसमध्ये करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकाना नामोहरम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आरोप राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केला आहे.

Russia-Ukraine war Live Updates : रशियाची ५ विमाने आणि हेलिकॉप्टर पाडली, युक्रेनचा दावा

या प्रकरणात फारसा अर्थ आहे, असं दिसतं नाही. कारण हे जुने प्रकरण आहे, ज्यांनी ही जमीन विकली आहे, त्यांच्यावर कारवाई न करता ज्यांनी घेतली आहे त्यांच्यावर कारवाई होतेय. लोकशाहीत विरोधी पक्षाचा देखील सन्मान ठेवायचा असतो. आज दुर्दैवाने टोकाची भूमिका घेतली जात आहे आणि कुणाला तरी अटक झाली की आनंदोत्सव केला जातोय. राजकारण कोणत्या दिशेनं चालल आहे हे दिसत आहे, असेहीते म्हणाले.

ब्लडबाथ! रशियाच्या युद्धाच्या घोषणेने शेअर बाजारात हाहाकार, काही मिनिटांत ७.५ लाख कोटींचा चुराडा

बुधवारी (दि. २३) इंदापूर शहरात उशिरा झालेल्या राष्ट्रवादी परिवार संवाद मेळाव्यात ते कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, युवकचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, दशरथ माने, सक्षणा सलगर, रविकांत वरपे, प्रताप पाटील, हनुमंत कोकाटे, अभिजीत तांबिले, छाया पडसळकर यांच्यासह पदाधिकारी तसेच कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अखेर युद्ध सुरू! युक्रेनवर रशियाची लष्करी कारवाई; १०० डाॅलरवर पोहोचल्या तेलाच्या किमती

पाण्यासाठी भीमा खोऱ्याचा अभ्यास

या भागातील पाण्याचा प्रश्न असून लोकसंख्या उद्योग आणि शेती क्षेत्राला शेतीच्या पाण्याच्या गरजा कशा भागवायचा यासाठी मी मंत्री म्हणून एक समिती नेमुन भीमा खोऱ्यातील या सर्व बाबींचा सर्वंकष अभ्यास करत आहे. पश्चिमेकडून वाहून जाणारे पाणी वळवण्यासाठी काही प्रकल्प राबवत गती देण्याचे काम जलसंपदामंत्री म्हणून करत आहे. पाणी जास्त उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नाची शिकस्त नुसतीच भाषणात न करता त्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले; मात्र विधानसभेला राज्यमंत्री भरणे यांना जे तीन हजाराचे मताधिक्य आहे ते ३० हजारावर नेण्यासाठी प्रयत्न करा, तुमची म्हणाल ती सेवा करायला मी तयार आहे, असे जयंत पवार त्यांनी स्पष्ट केले.

चक्क आजोबांनी पळवले वृद्ध प्रेयसीला!

दिल्लीच्या तख्तासमोर मोडेल पण वाकणार नाही : खासदार सुळे

देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना माझे दोन प्रश्न आहेत, विरोधात असले की लावता आणि तुमच्या पक्षात आले की गायब होते. तुम्ही कोणते औषध वापरतात ते सांगा, असे म्हणत महाराष्ट्र खूप अडचणीचा काळ चालला आहे. असे असले तरी दिल्लीच्या तख्तासमोर मोडेल पण वाकणार नाही, असे मत खासदार सुळे यांनी व्यक्त केले. इडीच्या नोटीसा आली की आपली सत्ता येते. कधी-कधी काही लोकांना त्यांची जागा दाखवावी लागते असे म्हणत ‘लढेंगे जरूर और जितेंगे भी जरूर’ असे त्या म्हणाल्या. आम्ही पक्ष प्रवेश केल्यामुळे आम्हाला इडीची काळजी नाही. कारण आम्ही भाजपमध्ये गेलो आहोत, असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी काही दिवसांपूर्वी भाषणात सांगितले होते. याचा उल्लेख करत त्यांनी पाटील यांच्यावर टिका केली.

नबाव मलिक यांच्या अटकेच्या निषेधार्थ मंत्र्यांचे आंदोलन

तालुक्यातील पाण्याचा प्रश्न सोडवा : राज्यमंत्री भरणे

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जलसंपदा मंत्री पाटील यांना इंदापूर तालुक्यातील प्रलंबित पाणी प्रश्न सोडविण्याची मागणी करत आम्हाला कोणाच्या हक्काचे किंवा वाटणीचे पाणी नको आम्हाला आमच पाणी द्या. खडकवासला, निरा डावा कालव्याचे पाणी आम्हाला मिळेल अशी योजना आणा, अशी मागणी केली.

Back to top button