जळगाव नगर परिषदांसाठी निवडणूक ; निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना जाहीर | पुढारी

जळगाव नगर परिषदांसाठी निवडणूक ; निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना जाहीर

जळगाव : पुढारी वृत्तसेवा  : जिल्ह्यात तसेच राज्यातील नगर परिषदा निवडणूक प्रक्रियेसाठी राज्य निवडणूक आयोगाकडून परिषदांच्या प्रभागरचना, सीमा, हरकती, सूचना, सुनावणी कार्यक्रम हे दि. 2 मार्च ते 5 एप्रिल दरम्यान जाहीर करण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील भुसावळ, अमळनेर, चाळीसगाव, चोपडा, पाचोरा, भडगाव, वरणगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, सावदा, रावेर, यावल, पारोळा आदी 15 नगर परिषदांची मुदत दीड-दोन वर्षांपूर्वीच संपुष्टात आली आहे, तर नशिराबाद ग्रामपंचायतीचे रूपांतर नगरपंचायतीमध्ये डिसेंबर 2021 पूर्वीच झाले आहे.

निवडणूकपूर्व कार्यक्रम
दि. 2 मार्च रोजी 2011 च्या जनगणनेनुसार लोकसंख्या, क्षेत्र, सीमांकन, नकाशा जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करणे. दि. 7 मार्च रोजी प्रारूप प्रभागरचना प्रस्ताव मान्यता देणे. दि. 10 ते 17 मार्च प्रारूप प्रभागरचना मार्गदर्शक नकाशे, सूचना मागविणे. दि. 22 मार्च प्राप्त हरकती सूचनांवर सुनावणी देणे. दि. 25 मार्चपर्यंत हरकती, सूचना विभागीय आयुक्तांकडे अहवाल पाठविणे. दि. 1 एप्रिल रोजी अंतिम प्रभागरचनेस मान्यता देणे. दि. 5 एप्रिल रोजी स्थानिक पातळीवर अधिसूचना जाहीर करणे.

हेही वाचा :

Back to top button