जळगाव महापालिका आयुक्तांची चौकशी करा : राष्ट्रवादीची मागणी | पुढारी

जळगाव महापालिका आयुक्तांची चौकशी करा : राष्ट्रवादीची मागणी

जळगाव, पुढारी वृत्तसेवा :

जळगाव महापालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्या कारभाराची चौकशी करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन जळगाव राष्ट्रवादी काँग्रेस महानगरचे जिल्हाध्यक्ष अशोक लाडवंजारी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांना निवेदन दिले.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्या अडीच वर्षांपासून जळगाव महापालिकेचे आयुक्तपदी सतीश कुलकर्णी यांची नेमणूक करण्यात आली आहे. या पदावर नेमणूक झाल्यापासून त्यांची कार्यपद्धती संशयास्पद आहे. गैरव्यवहार व भ्रष्टाचार्‍यांना पाठीशी घालणे, शिक्षा झालेल्या नगरसेवकांबाबत ठोस भूमिका न घेणे, वाटरग्रेस, अमृत योजना, भुयारी गटारी योजना, घनकचरा प्रकल्प, एलईडी लाईट पुरवठा, नियमबाह्य नेमणुका, नियमबाह्य ठरावांची अंमलबजावणी यासंदर्भात आयुक्तांची भूमिका संशयास्पद आहे.

गेली अनेक दिवसांपासून जळगाव महानगरपालिकेच्या  पैशांची उधळपट्टी सुरू आहे. अनेक कामे बेकायदेशीरपणे सुरू आहेत. वाढीव कराचा अंदाजपत्रके देणे, वर्कऑर्डर नसताना कामे करणे, अनेक काम करण्याची मुदत संपत असताना मुदतवाढ देणे व निविदा अटी शर्तीनुसार दंड आकारणी न करणे, असा मनमानी कारभार महापालिकेत सुरू आहे. परंतु कोणत्या कामाबाबत दखल न घेतल्यामुळे भ्रष्टाचार करण्याची हिम्मत वाढत आहे, असेही निवेदनात म्‍हटलं आहे.

केंद्राकडून व राज्याकडून व नियोजन समितीकडून येणारा निधीतून करण्यात येणाऱ्या कामाबाबत तक्रारी वाढत आहे. ठेकेदारांकडून तीन ते पाच टक्के हिस्स्याची मागणी केली जात आहे. अशी तक्रार अभियंता अरविंद भोसले यांनी मंत्रालयात तक्रार दिली आहे. जळगाव महानगरपालिकेचे आयुक्त सतीश कुलकर्णी (जळगाव) यांच्या संशयास्पद कामाची व अभियंता अरविंद भोसले यांच्या तक्रारीची दखल घेऊन आयुक्त सतीश कुलकर्णी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात करण्‍यात आली आहे.

हेही वाचलत का ?

Back to top button