MI vs KKR : कोलकात्ताचे मुंबईसमोर १७० धावांचे लक्ष्य | पुढारी

MI vs KKR : कोलकात्ताचे मुंबईसमोर १७० धावांचे लक्ष्य

पुढारी ऑनलाईन डेस्क :  मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या आजच्या सामन्यात कोलकत्ताने १९.५ षटकात १६९ धावा करत मुंबईसमोर १७० धावांचे लक्ष ठेवले आहे. नाणेफेक गमवल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या कोलकाता नाईट रायडर्सचा संघ मुंबई इंडियन्सविरुद्ध संघर्ष करताना दिसला. ५७ धावांवर संघाने पाच विकेट गमावल्या. मुंबईच्या मारक गोलंदाजीसमोर सॉल्ट-नरीनसारखे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात सॉल्टने पाच धावा, रघुवंशीने १३ धावा, श्रेयस अय्यरने ६ धावा, सुनील नरेन याने ८ धावा आणि रिंकू सिंगने ९ धावा केल्या.

यानंतर मयंक पांडे आणि व्यंकटेश अय्यर यांनी मोर्चाचा ताबा घेतला. दोघांमध्ये सहाव्या विकेटसाठी ६२ चेंडूत ८३ धावांची भागीदारी झाली. प्रभावशाली खेळाडू म्हणून आलेल्या मनीष पांडे याला हार्दिक पांड्याने बाद केले. तो ४२ धावा करून परतला. कोलकाताला १७ व्या षटकात दोन धक्के बसले. या षटकात आंद्रे रसेल याला केवळ सात धावा करता आल्या.

या सामन्यात मुंबईच्या गोलंदाजांनी धुमाकूळ घातला. जसप्रीत बुमराहने तीन विकेट घेतल्या. वानखेडे स्टेडियमवर त्याने ५० विकेट पूर्ण केल्या. त्याने रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क आणि व्यंकटेश अय्यर यांना बाद केले. अय्यरने मुंबईविरुद्ध ७० धावांची शानदार खेळी केली. यादरम्यान त्याच्या बॅटमधून सहा चौकार आणि तीन षटकार आले. मुंबईतर्फे नुवान तुषाराने तीन, कर्णधार पांड्याने दोन आणि पियुष चावलाने एक विकेट घेतली.

मुंबई इंडियन्स : हार्दिक पंड्या (कर्णधार),  ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, नेहल वढेरा, नमन धीर, टिम डेव्हिड, जेराल्ड कोएत्झी, पियुष चावला, जसप्रीत बुमराह, नुवान तुषारा

कोलकाता नाईट रायडर्स : श्रेयस अय्यर (कर्णधार), फिल सॉल्ट (यष्टीरक्षक), सुनील नरेन, अंगक्रिश रघुवंशी,  व्यंकटेश अय्यर, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, रमणदीप सिंग, मिचेल स्टार्क, वैभव अरोरा, वरुण चक्रवर्ती

Back to top button