कळवण नगरपंचायत : नगराध्यक्षपदी कौतिक पगार तर उपनगराध्यक्षपदी हर्षाली पगार बिनविरोध | पुढारी

कळवण नगरपंचायत : नगराध्यक्षपदी कौतिक पगार तर उपनगराध्यक्षपदी हर्षाली पगार बिनविरोध

कळवण पुढारी वृतसेवा : कळवण नगरपंचायत नगराध्यक्षपदी कौतिक (महाराज) पगार तर उपनगराध्यक्षपदी हर्षाली जयेश पगार यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी विकास मीना यांनी निवडीची घोषणा केली. त्यानंतर गांधी चौक परिसरात ढोल ताशे वाजवून फटाक्याची अतिशबाजी करण्यात आली.

कळवण नगर पंचायत सार्वत्रिक निवडणूक अनेक कारणांमुळे जिल्ह्यात गाजली असली तरी नगर पंचायतीचे सर्वेसर्वा राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते कौतिक पगार यांनी आमदार नितीन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांमुळे जनता जनार्दनने मतांचे दान “महाराज” यांच्या पारड्यात टाकले आहे. महाविकास आघाडीला सर्वाधिक १४ जागा मिळाल्या आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेसचे – ९, काँग्रेसचे -३ शिवसेनेचे – २, भाजपाचे -२, व मनसेचे – १ उमेदवार निवडून आले आहेत. नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण जागेचे आरक्षण निघाल्याने आमदार नितीन पवार यांचे खंदे समर्थक राष्ट्रवादीचे गटनेते कौतिक पगार यांची बिनविरोध निवड झाली आहे. तसेच उपनगरध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या हर्षाली जयेश पगार यांची ही बिनविरोध निवड झाली आहे.

यावेळी आमदार नितीन पवार, बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार, रोहित पगार, गौरव पगार, तेजस पगार, बाळू जाधव, मयूर बहिरम, चेतन मैंद, सुनीता पगार, रत्ना पगार, लता निकम, जोत्सना जाधव, रोहिणी महाले, ताराबाई आंबेकर, भारती पगार, भाग्यश्री शिरोडे आदी उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button