मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई ; आंतरराज्यीय टोळीतील दरोडेखोर जेरबंद | पुढारी

मंगळवेढा पोलिसांची धडक कारवाई ; आंतरराज्यीय टोळीतील दरोडेखोर जेरबंद

मंगळवेढा: पुढारी वृत्तसेवा
मंगळवेढा (Mangalvedha crime) पोलीस ठाण्याच्या हद्‍दीत सलग दोन दरोडे पडल्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. हे दोन्ही दरोडे उघडकीस आणण्याचे पोलिसांसमाेर आव्हान होते. या प्रकरणात सखोल तपास करून पाेलिसांनी आरोपींना अटक केली आहे अशी माहिती मंगळवेढा उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांची पत्रकार परिषदत दिली. मंगळवेढा पोलिसांच्या (Mangalvedha crime) या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मंगळवेढामधील दामाजीनगर येथे सुवर्णा हजारे यांच्या बंगल्यावर दराेडा पडला हाेता. दरोडेखोरांनी सुवर्णा व त्यांच्या पतीला लोखंडी गजाने मारहाण करत, १.५ तोळे वजनाचे सोने नेले होते. दुस-या घटनेमधील चैतन्यनगर नागणेवाडी येथील मंदाकिनी सावजी यांच्या बंगल्याच्या दरवाजाची कडी तोडुन आत प्रवेश केला. नवविवाहित दाम्‍पत्‍याला ठार मारण्याची धमकी देत  ११ तोळे सोने दागिने लुटले हाेते.

उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील म्हणाल्या,  पोलिसांनी ३१ जानेवारी २०२२ रोजी लोणावळा येथून दरोडेखोरांना अटक केली. न्‍यायालयाने आरोपींना ७ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

अमृता अरोराचे पतीसोबत अंडरवॉटर किसींग; चाहते म्हणाले राज कुंद्रा काय करतोय तिथं ! (video)

या आराेपींनी महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश, कर्नाटक येथील गुन्‍ह्यांची कबुली दिली आहे. यातील आणखी आरोपींचा शोध घेवून त्यांना अटक करण्यास पोलीस प्रशासन प्रत्नशील आहे. ही कारवाई  मंगळवेढा विभाग पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील, स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण पोलीस निरीक्षक रणजीत माने यांनी केली.

हेही वाचलं का?

Back to top button