जळगाव क्राईम : लंगडाआंबा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग | पुढारी

जळगाव क्राईम : लंगडाआंबा येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : यावल तालुक्यातील लंगडाआंबा येथील एका १३ वर्षीय  मुलीचा वनरक्षकाने विनयभंग केल्याचा आरोप पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी केला. याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विनयभंग झालेल्या अल्पवयीन मुलीच्या आईने तक्रार दिली आहे. पोलिस यंत्रणेकडून तपासाअंती गुन्हा दाखल करण्यात आला. सातपुडा पर्वताच्या अतिदुर्गम ठीकाणी लंगडाआंबा या आदीवासी वस्तीवर १३ वर्षीय अल्पवयीन मुलगी १३ जुलै रोजी लहान भावंडाबरोबर घरात होती. वनरक्षक कर्मचाऱ्यांने घरात घुसून तिचा विनयभंग केल्याची घटना घडली.

अधिक वाचा :

याबाबत १४ जुलैच्या रात्री उशीरा पीडित मुलीच्या आईची तक्रार घेण्यात आली. चौकशीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित बालिकेच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार लगडाआंबा पाड्यावरील घरी मंगळवारी वनरक्षक आरोपी रमेश बाबुता थोरात  सकाळी आला.

त्यावेळी पीडित मुलीचे आई व वडील खरगोनला (मध्य प्रदेश) गेले होते. वनरक्षक थोरात घरात पाणी पिण्याच्या उद्देशाने आला. ६ वर्षीय बहिणीने पाणी आणले असता तू २० रूपये घे व हातपंपावरून ताजे पाणी आण, असे सांगीतले.

अधिक वाचा :

दुसऱ्या बहिणला २० रूपये दिले व बिस्कीट आण असे सांगत बाहेर पाठवले. त्यानंतर पीडित बालिकेचा विनयभंग केला हा प्रकार पीडित मुलीने सायंकाळी आई, वडीलांना सांगीतल्यावरून बुधवारी मुलीच्या आई वडीलांनी व नातेवाईकांनी यावल पोलिस स्टेशन गाठले.

वनविभागाकडून मात्र असा प्रकार झाला नसल्याचे सांगुन घडलेल्या घटनेचा इन्कार केला जात आहे. आठ तास खलबत केल्यानंतर रात्री ११ वाजेला पीडितेच्या आईचा अर्ज घेऊन चौकशीअंती यावल पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरिक्षक विनोद खांडबहाले करीत आहेत.

अधिक वाचा :

Back to top button