नवी दिल्ली; पुढारी ऑनलाईन : आफ्रीन फातिमा ही २३ वर्षाची विद्यार्थिनी, सामाजिक कार्यातही आघाडीवर असते. तिने ४ जुलैला मुस्लीम महिला यांची भारतात होणारी छळवणूक विषयावरील ऑनलाईन फोरममध्ये भाग घेतला होता. पण, तिने काही वेळात हा ऑनलाईन सेशन आवरता घेतला. कारण तिच्या मोबाईलवर मेसेजेसचा पाऊस पडला होता.
या मेसेजेसमध्ये आफ्रीनला ऑनलाईन लिलावात ठेवले असल्याचे सांगण्यात आले. अशा प्रकारे ध्यानीमनी नसताना ऑनलाईन विक्रीसाठी ठेवण्यात आलेली आफ्रीन ही एकटी महिला नव्हती. अशा अजून ८० मुस्लीम महिला त्यांचे फोटो, ज्यात विद्यार्थी, चळवळीत काम करणाऱ्या स्त्रीया आणि पत्रकार महिलांचा समावेश होता. या सर्वांचे फोटो सुली डील या अॅपवर अपलोड करण्यात आले होते.
ज्यांनी अॅपची निर्मिती केली त्यांनी सुली या शब्दप्रयोग वापरला. हा शब्दप्रयोग उजव्या विचारसरणीचे कथाकथीत हिंदू ट्रोलर्स मुस्लीम महिला विषयी वापरात.
अधिक वाचा :
याबाबत आफ्रीनने एका आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत म्हणते, 'त्या रात्री मी ज्या लोकांनी मला मेसेज केले त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. मी फक्त माझ्या ट्विटर अकाऊंटमधून बाहेर पडले. माझ्यात त्यांना प्रतिक्रिया देण्याचा त्राणच नव्हता.'
आफ्रीनने सांगितले की, हा प्रकार कट्टर हिंदूत्ववादी पुरुषाने पतौडी येथून एका मुस्लीम महिलेचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाल्याच्या दिवशीच घडला. पतौडी हे दिल्लीपासून ६० किमी अंतरावर आहे. आफ्रीन पुढे म्हणाली की, मी खूपच अस्वस्थ आहे. मी झोपू शकत नाही.
भारतापासून हजारो किलोमिटर लांब न्यूयॉर्कमधील २५ वर्षीय हिबा बेग नुकतीच स्वातंत्र्य दिवस साजरा करुन घरी परतली होती. ती घरी आल्यावर तिला आपली प्रोफाईलही सुली डील्सवर अपलोड झाल्याचे निदर्शनास आले.
हिबाची भारतापासून इतक्या अंतरावर असूनही या मनस्तापापासून सुटका झाली नाही. तिच्या मनात अमानवीपणाची आणि पराभूत झालेल्याती भावना निर्माण झाली. ती न्यूयॉर्कमधील कोलंबिया विद्यापीठात पॉलिसी विषयाचा अभ्यास करत आहे.
अॅप होस्ट करणारे गिटहबने लोकांच्या तक्रारी आणि रोष वाढू लागल्यानंर हे अॅप बंद केले. त्यांच्या प्रवक्त्यांनी 'आम्ही वापरकर्त्याचे अकाऊंट निलंबित केले आहे. तपासाअंती त्यांनी आमच्या धोरणांचे उल्लंघन केले आहे हे स्पष्ट होते.' अशा मेल संबधित वृत्तसस्थेला पाठवला.
अधिक वाचा :
या मेलमध्ये गिटहबने छळ, दुजाभाव आणि हिंसेला प्रोत्साहन देणे आमच्या धोरणात बसत नाही. आम्ही त्या विरोधात आहोत असे म्हटले आहे.
दरम्यान, दिल्ली महिला आयोग आणि राष्ट्रीय महिला आयोग यांनी या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. त्यानंतर या प्रकरणात ८ जुलै रोजी दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केली. या प्रकरणानंतर बऱ्याच मुस्लीम महिला ऑनलाईन व्यक्त झाल्या. त्यांनी या प्रकरणावर रोष व्यक्त केला होता.
दिल्ली पोलिसांचे पीआरओ चिन्मय बिस्वाल यांनी सांगितले की या प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणी गिटहब ला नोटीस देऊन संबंधित घटनेबाबतचे तपशील देण्यास सांगितले आहे. पण, आठवडा झाला तरी अजून या प्रकरणी कोणालाही अटक झालेली नाही.
अशा प्रकराचे ट्रोलिंग अनुभवलेल्या पत्राकर आणि कार्यकर्त्या राणा आयुब या प्रकरणावर म्हणाल्या हे सर्व पद्धतशीरपणे केले जाते. यातून ज्या मुस्लीम महिला आवाज उठवतात त्यांना लक्ष्य बनवले जाते.
राणा आयूब म्हणाल्या, 'कथाकथीत हिंदूत्ववादी गट ऑनलाईन लैंगिक हल्ले करणे हा मुस्लीम महिलांचा आवाज दाबण्याचा एकमेव मार्ग आहे असे समजतात. त्यांच्या मतानुसार आम्ही शोषित आहोत. तुम्ही तुमचा आवाज उठवण्याची हिम्मत कशी केली.'
माध्यमात काम करणाऱ्या सानिया अहमद यांचीदेखील प्रोफाईल सुली डिल्स अॅपवर तयार करण्यात आली होती. यावर सानिया अहमद म्हणाल्या की अशा प्रकारचा ऑनलाईन हिंसाचार कठोरपणे मोडून काढला पाहिजे.
या ३४ वर्षाच्या मुस्लीम महिलांसाठी आवाज उठवणाऱ्या महिलेचे जवळापास ३४ हजार फॉलोअर्स आहेत. त्यांनी ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर लौंगिक हल्ले करणे आणि ऑनलाईन धमक्या देण्यासाठी वापरले जातात.
अधिक वाचा :
सानिया पुढे म्हणाल्या की, 'ही खूप दुःखद गोष्ट आहे. पण आम्हाला आता याची सवय झाली आहे. गेल्या वर्षी हिंदुत्वावाद्याच्या अकाऊंटवरून एक पोल घेण्यात आला होता. त्यात यापौकी कोणती सानिया मी माझ्या जनानखान्यासाठी निवडू? असा प्रश्न विचारण्यात आला होता. आम्ही या पोलची तक्रार केली होती. पण, हा फक्त २४ तासच चालवण्यात आला.'
'त्यानंतर या पोलचा निकाल प्रकाशित करण्यात आला. या निकालाच्या खाली आलेल्या कमेट जास्तच हिंसक होत्या. यातील एक कमेंट तर त्यांना आपण आपल्या जनानखान्यात तरी का घ्यायचे. फक्त संभोग करा आणि फेकून द्या अशी होती. तर दुसरी कमेंट मी त्यांचे मुंडके धडावेगळे करुन ते माझ्या भींतीवर सजवून ठेवणार अशी होती.' सानिया अहमद यांनी त्यांच्याबाबतीत घडलेला हा भयानक प्रसंग सांगितला.
युवा विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ती आफ्रीन फातिमा म्हणाली की, जर एखाद्याने या डील ऑफ द डेवर दावा केला तर? मला नाही वाटत की कोणी त्याला अस करण्यापासून रोखेल. पण, याच बरोबर मला असे वाटते की मी कधीही आवाज उठवणे बंद करणार नाही. आम्ही ट्विटर, इन्स्टाग्राम, फेसबूक आनलाईन ऑफलाईन कोणतीही सार्वजनिक जागा असू दे तेथे व्यक्त होणारच.
सुली डील्स अॅपवर हाना मोहसीन खान यांची देखील फ्रोफाईल तयार करण्यात आली होती. त्यांनी याविरोधात एक व्हॉट्स अॅप ग्रुप तयार केला. सॉलिडॅरिटी असं या ग्रुपच नाव आहे. यात सुली डील्स अॅपवर लक्ष्य केल्या गेलेल्या २० मुस्लीम महिला सक्रीय आहेत.
हाना मोहसीन खान या एका देशांतर्गत विमानसेवा देणाऱ्या कंपनीत पायलट आहेत. त्यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. त्या म्हणाल्या की या महिलांचा पाठिंबा मला पुढे जाण्यास मदत करत आहे.
खान म्हणाल्या 'आम्ही एकमेकींना पाठिंबा दोतो. आम्ही सगळ्या जणी एकत्र काम करत आहोत. आम्ही फार कमी वेळा झोपतो. आम्ही या प्रकरणावर गप्प बसणार नाही. हे प्रकरण असेच सोडून देणार नाही.'
हेही वाचले का?
पाहा व्हिडिओ : हेमांगी कवी ब्रा आणि बुब्जवर बोलली कारण…
https://youtu.be/pwbK_–MP4s