मुंबई ;पुढारी वृत्तसेवा: टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ मध्ये चांगले यश मिळवल्यास शासनातर्फे तुमचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेक सुयश जाधव या दिव्यांग जलतरणपटूला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. यावेळी जयंत पाटील यांनी दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव याला व्हिडीओ कॉलव्दारे शुभेच्छा दिल्या आहेत.
सोलापूरातील करमाळा तालुक्यातून येणाऱ्या दिव्यांग जलतरणपटू सुयश जाधव यांच्याशी आज गुरुवारी व्हिडीओ कॉलद्वारे जयंत पाटील यांनी संवाद साधला.
अधिक वाचा
सुयश जाधव यांचे नाव यंदाच्या टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ स्पर्धेसाठी भारताच्यावतीने निश्चित झाल्याचे वर्तमानपत्रातून समजले. यानंतर जयंत पाटील यांनी अपंगत्वावर मात करत महाराष्ट्राचं नाव मोठं करणाऱ्या सुयशला फोनवरून संपर्क साधला.
जयंत पाटील यांनी फोनद्वारे सुयशला शुभेच्छा देत टोकियो पॅराऑलिम्पिक २०२१ मध्ये चांगले यश मिळवल्यास शासनातर्फे तुमचा योग्य सन्मान केला जाईल, असे आश्वासन दिले आहे.
अधिक वाचा
सुयश यांनी २०१६ साली झालेल्या रियो पॅराऑलिम्पिक स्पर्धेतही भाग घेतला होता. २०१८ साली त्यांना महाराष्ट्र शासनाचा मानाचा एकलव्य पुरस्कार देण्यात आला. तर २०२० साली त्यांना भारत सरकारचा अर्जून पुरस्कार देण्यात आला.
जागतिक पातळीवर सुयश यांनी आतापर्यंत १२३ मेडल्स मिळवले आहेत. शारीरिक आव्हानांवर मात करत त्यांनी मिळवलेले हे यश खूपच कौतुकास्पद असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.
अधिक वाचा
जागतिक पातळीवर विविध स्पर्धेत भाग घेऊन यश मिळवणाऱ्या दिव्यांग खेळाडूंचा मागील सरकारने यथोचित सन्मान केला नाही, अशी खंत जयंत पाटील यांना यावेळी बोलून दाखवली. आमचे सरकार तुमच्या गौरवासाठी कायम पुढे असेल, अशी ग्वाहीही त्यांनी सुयशला दिली.
हेही वाचलंत का?
पाहा :आम्ही शब्दवारीचे वारकरी; संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. सदानंद मोरे भाग-15