पिंपरी क्राईम : यम भाई ची पोलिसांनी काढली ‘धिंड’!

पिंपरी क्राईम
पिंपरी क्राईम
Published on
Updated on

पिंपरी; पुढारी वृत्तसेवा : सोशल मिडियावर घातक शस्त्रांचे प्रदर्शन करीत दहशत निर्माण करणाऱ्या यम भाईची पोलिसांनी परिसरात धिंड काढली. गुंडा विरोधी पथकाने यम भाईवर गुरुवारी (दि. १५) दुपारी ही कारवाई केली. या कारवाईनंतर यम भाई म्हणून मिरवणा-याची चांगलीच जिरली असल्याची चर्चा परिसरात रंगली.

अधिक वाचा :

मयुर उर्फ यमभाई अनिल सरोदे (२१, रा. दुर्गानगर, आकुर्डी) असे धिंड काढलेल्या आरोपीचे नाव आहे. गुंडा विरोधी पथकातील पोलीस नाईक विजय दत्तात्रय तेलेवार यांनी बुधवारी (दि. १४) चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, आरोपी यमभाई याने 'आमची सूत्रे येरवडा जेलमधून हालतात, असे म्हणत एक व्हिडिओ शूट केला. सोशल मिडियावर हा व्हिडीओ व्हायरल करीत त्याने समाजात दहशत पसरवण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा :

याबाबत माहिती मिळताच बुधवारी पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने या यमभाईला बेड्या ठोकल्या अटक केली. त्याच्या विरोधात चिखली पोलीस ठाण्यात गुन्हाही दाखल करण्यात आला. दरम्यान तपासाकरिता आरोपीला पोलिसांनी तो राहत असलेल्या दुर्गानगर परिसरातून हातात बेड्या घालून फिरविले. यावेळी परिसरातील नागरिक त्याला पाहत होते. या संधीचा फायदा घेत पोलिसांनी यमभाईच्या पायावर फटके देखील दिले.

अधिक वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news