जळगाव क्राईम : अडीच हजाराची लाच घेताना लिपीकाला अटक | पुढारी

जळगाव क्राईम : अडीच हजाराची लाच घेताना लिपीकाला अटक

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : सार्वजनिक बांधकाम विभाग रावेर येथील कनिष्ठ लिपीक अडीच हजार रुपयांच्या लाचेची मागणी व स्विकार करताना एसीबीच्या जाळ्यात अडकला आहे. शेख वसीम शेख फयाज असे लाचखोर लिपिकास अटक करण्यात आली आहे.

तक्रारदाराचे वडील सार्वजनिक बांधकाम विभाग, रावेर येथून वयोमानाप्रमाणे रितसर सेवानिवृत्त झाले आहेत. त्याच्या ग्रॅज्युएटीची 3,91,710 एवढी रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा केल्याच्या मोबदल्यात लाच मागण्यात आली. यासाठी ग्रॅज्युएटीच्या रकमेसाठी दोन हजार रुपये आणि अर्जीत रजेची येणा-या रकमेसाठी पाचशे रुपयांची मागणी लिपिक शेख वसिम शेख फयाज याने तक्रारदाराकडे केली.

अधिक वाचा :

या मागणीची पडताळणी पुर्ण झाल्यानंतर एसीबीकडून सापळा रचण्यात आला. लाचेची रक्कम घेतांना एसीबीच्या सापळ्यात लिपिक शेख वसिम हा अलगद सापडला.

उप अधिक्षक सतिष भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. संजोग बच्छाव, पो.नि. लोधी, सफौ.दिनेशसिंग पाटील, पोहेकॉ.अशोक अहीरे, पोहेकॉ. सुनिल पाटील, सफौ. सुरेश पाटील, पोहेकॉ. रविंद्र घुगे, पोना. मनोज जोशी, पोना.सुनिल शिरसाठ, पोना.जनार्धन चौधरी, पोकॉ.प्रविण पाटील, पोकॉ.नासिर देशमुख, पोकॉ.ईश्वर धनगर, पोकॉ.प्रदिप पोळ, पो.कॉ. महेश सोमवंशी आदींन या सापळ्यात सहभाग घेतला.

अधिक वाचा :

 

Back to top button