

पुणेः पुढारी वृत्तसेवा : अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत एका महिलेला एक कोटीच्या खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार शहरात समोर आला आहे. संशयिताने महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र देखील चोरीले आहे. अश्लील व्हिडीओ आणि फोटो परत देण्याच्या बदल्यात एक कोटी रुपयांची खंडणीही मागितली हाेती
याप्रकरणी, सौरभ सुभाषचंद्र सुखिजा (वय.३१,रा. पटियाला पंजाब) याच्या विरुद्ध बलात्कार, खंडणीचा गुन्हा वानवडी पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
अधिक वाचा :
याबाबत एका ३४ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. ही घटना २०१९ पासून गुन्हा दाखल होईपर्यंतच्या कालावधीत घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये फिर्यादी महिलेची आरोपी सौरभ सोबत फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली . सौरभ याने प्रेमाच्या जाळ्यात खेचून महिलेचे न्यूड फोटो व व्हिडीओ तयार केले.
अधिक वाचा :
त्यानंतर ते व्हिडीओ सोशल मिडीयावर अपलोड करण्याची धमकी देत महिलेच्या मनाविरुद्ध शरीर संबंध ठेवले.
ते सर्व व्हिडीओ सर्वांना दिसावे या उद्देशाने स्टेटसला ठेवून प्रसारीत केले. यानंतर महिलेचे दोन तोळ्याचे मंगळसूत्र चोरी केले.
महिलेला फोनद्वारे ब्लॅकमेल करून शिवागाळ करत सर्व न्यूड फोटो व व्हिडीओ परत देण्याच्या बदल्यात एक कोटीच्या खंडणीची मागणी केली.
अधिक वाचा :
दरम्यान फिर्यादी महिलेने सुरुवातीला सायबर पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता.अर्जाच्या चौकशीनंतर गुन्हा दाखल करून तो पुढील तपासासाठी वानवडी पोलिसांकडे वर्ग केला आहे.
हे ही वाचा :