नाशिक : वॉरंट बजावण्यास गेलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या पोलीसावर चॉपरने हल्ला | पुढारी

नाशिक : वॉरंट बजावण्यास गेलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या पोलीसावर चॉपरने हल्ला

मनमाड ; पुढारी वृत्तसेवा

शासकीय कर्मचारी आणि पोलिसांवर हल्ला (Attack) होणाऱ्या घटना वारंवार घडत असून अशीच एक धक्कादायक घटना मनमाड शहरात घडली. वॉरंन्ट बाजविण्यासाठी गेलेल्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या पोलिसावर ४ जणांनी चॉपरने जीवघेणा हल्ला केला असून या हल्ल्यात पोलीस गंभीर जखमी झाला आहे. त्याला नाशिकच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून ताे मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेमुळे शहर परिसरात खळबळ उडाली.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून एक आरोपीला अटक केली तर 3 आरोपी फरार झाले आहेत. त्यांना ही लवकरच गजाआड केले जाईल असे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी पत्रकारांना सांगितले. दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक चंद्रकांत खांडवी यांनी मनमाडला भेट देवून जखमी पोलिसाची विचारपूस केली.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार रॅपिड ऍक्शन फोर्सचा पोलीस जवान सूरज उगलमुगले ह्याच्याकडे शुभम चुनियन (रा.इदगाह) याला वॉरंट बजाविण्याची जबाबदारी देण्यात आली होती. शुभम हा रेल्वे स्थानकाच्या बाहेर त्याच्या मित्रा सोबत एका पान दुकानावर उभा असल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरज त्याला वॉरंट देण्यासाठी गेला असता मी वॉरंट घेणार नाही असे सांगत शुभमने पोलीस जवानांशी हुज्जतच घातली. (Attack)

त्याला शिवीगाळ देखील केली. वाद इतका विकोपाला गेला कि शुभमने पोलीस जवान सुरज याच्या पोटावर चॉपरने वार केला. घाव वर्मी लागल्यामुळे सुरज जागीच कोसळला. हल्ला केल्यानंतर तिघे आरोपी फरार झाले. आपल्या पोलिसावर जीवघेणा हल्ला झाल्याची माहिती मिळताच सहय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते, गौतम तायडे आणि इतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी सुरजला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

येथे प्रथमिक उपचार केल्यानंतर सुरजला नाशिकच्या खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून तो मृत्यूशी झुंज देत आहे. पोलिसांनी या प्रकरणी मुख्य आरोपी शुभम चुनियान सोबत फरार झालेल्या तिघा विरुद्ध भाद्वी ३०७, ३५३, २२३ यासह इतर कलमान्वये गुन्हा दाखल करून प्रवीण कुमावत याला अटक केली आहे.

उर्वरित आरोपी फरार झाले असून त्यांचा शोध घेतला जात आहे. शुभम चुनियन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर हाप मर्डर, दरोडा, चोरी, मुलीं व महिलांची छेड काढणे, पोलिसांवर हल्ला करणे असे एकूण १७ गुन्हे दाखल असल्याची माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते यांनी दिली. जर पोलीस सुरक्षित नसतील तर मग सर्वसामान्य नागरिकांचा काय असा प्रश्न उपस्थित केला जात आहे

Back to top button