अमळनेर : 'त्‍या' तरुणीने घरातील १० लाखांच्‍या ऐवजासह पलायन केल्‍याचे उघड | पुढारी

अमळनेर : 'त्‍या' तरुणीने घरातील १० लाखांच्‍या ऐवजासह पलायन केल्‍याचे उघड

जळगाव; पुढारी वृत्तसेवा : अमळनेर येथून प्रियकरासोबत फरारी झालेल्या तरुणीने घरातील दागिने आणि रोख रकमेसह एकूण १० लाख ८० हजारांचे ऐवजा नेल्‍याचे उघड झाली आहे. ती २५ नाेव्‍हेंबर राेजी पलायन केले हाेते.

अमळनेर येथील या घटनेनंतर मुलीच्या आईने घरात तपासणी केली असता ३ लाख २० हजार रुपयांच्या प्रत्येकी ४ तोळ्यांच्या दोन पोत, तसेच चार- चार तोळ्यांचे ३ लाख २० हजारांचे दोन हार, साडे तीन तोळ्यांच्या एक लाख ४० हजार रुपयांच्या दोन सोन्याच्या साखळ्या आणि रोकड असा १० लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेल्याचे लक्षात आले.

याप्रकरणी मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून प्रेमीयुगुलांसह पाच जणांवर अपहरणासह चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या घटनेमुळे परिसरात निर्माण झालेला तणाव निवळला आहे. पलायन केलेल्‍या प्रेमीयुगलाचा पाेलिस शाेध घेत आहेत.

हेही वाचलंत का? 

 

Back to top button