shardul thakur engagement: शार्दुलचा गर्लफ्रेंडशी साखरपुडा, लग्नाचा प्लॅनही आला समोर | पुढारी

shardul thakur engagement: शार्दुलचा गर्लफ्रेंडशी साखरपुडा, लग्नाचा प्लॅनही आला समोर

मुंबई : पुढारी ऑनलाईन

भारताचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर (shardul thakur) आणि त्याची गर्लफ्रेंड मिताली परुलकर (shardul thakur and mitali parulkar) यांचा साखरपुडा झाला आहे. कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलात पार पडला. त्यांचे साखरपुड्याच्या कार्यक्रमातील फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. भारतीय क्रिकेटपटूंपैकी कोणी सामील झाले आहे की नाही हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान शार्दुलच्या लग्नाच्या तारखेबाबत अधिकृत माहिती समोर आलेली नाही.पण तो पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपनंतर लग्न करू शकतो, असे सूत्रांकडून समजते आहे.

३० वर्षीय शार्दुल ठाकूर (shardul thakur) सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. सध्या तो ब्रेकवर आहे. त्याने आतापर्यंत चार कसोटी, १५ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. तो नुकताच T20 विश्वचषकासाठी भारतीय संघाचा भाग होता. यापूर्वी आयपीएल २०२१ मध्ये तो चेन्नई सुपर किंग्जकडून खेळला होता. अलीकडच्या काळात शार्दुल तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाकडून खेळत आहे. कसोटीत त्याने फलंदाजीतही चांगली कामगिरी केली आहे. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड दौऱ्यावर त्याने अर्धशतके झळकावली. त्यामुळे त्याचे खूप कौतुक झाले.

शार्दुल ठाकूर (shardul thakur) हा मूळचा पालघरमधील आहे. २०१७ मध्ये त्याने टीम इंडियामध्ये पदार्पण केले. तर, २०१८ मध्ये कसोटी पदार्पण झाले. त्याने आतापर्यंत कसोटीत १४, वनडेत २२ आणि टी-२० मध्ये ३१ बळी घेतले आहेत. शार्दुल ठाकूर आणि रोहित शर्मा हे एकत्र खेळत होते. दोघांचे एकाच होते. त्यांचे नाव दिनेश लाड असे आहे. यांच्याकडूनच दोघांनी खेळातील बारकावे शिकून घेतले. शालेय जीवनात त्याने सहा चेंडूंत सहा षटकार मारण्याचा पराक्रमही केला होता.

पुढे मुंबईच्या संघासाठी शार्दुलने देशांतर्गत क्रिकेटमध्ये लक्षवेधी कामगिरी केली. या कामगिरीच्या जोरावर त्याला टीम इंडियात स्थान मिळाले. मुंबईला रणजी चॅम्पियन बनवण्यातही त्याचा महत्त्वाचा वाटा होता. आयपीएलमध्ये त्याचे पदार्पण पंजाब किंग्जकडून झाले. पण नंतर चेन्नई सुपर किंग्जमध्ये येऊन त्याला यश मिळाले. येथे तो २०१८ आणि २०२१ मध्ये विजेतेपद जिंकणाऱ्या संघाचा भाग होता.

 

Back to top button