लसीकरणात महाराष्ट्र राज्य देशात दुसरे | पुढारी

लसीकरणात महाराष्ट्र राज्य देशात दुसरे

  • आतापर्यंत 11 कोटी 19 लाख डोस

  • प्रथम क्रमांकावर उत्तर प्रदेश

  • देशात एकूण लसीकरण : 122 कोटी 43 लाख

  • महाराष्ट्रात एकूण लसीकरण 11 कोटी 19 लाख

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशात लसीकरणात महाराष्ट्र राज्याने आघाडी घेतली आहे. आतापर्यंत 11 कोटी 19 लाख लस देत राज्य देशात क्रमांक दोनवर आहे, तर क्रमांक एकवर उत्तर प्रदेश आहे. तेथे आतापर्यंत 15 कोटी 94 लाख लसीचे डोस देण्यात आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर पश्चिम बंगाल असून तेथे 9 कोटी 15 लाख डोस देण्यात आले आहेत.

dr raman gangakhedkar : ‘ओमिक्रॉन’चा भारतात धोका कमी; पण..!

देशात यंदाच्या 16 जानेवारीपासून लसीकरण सुरू झाले, तेव्हा सुरुवातीला डोस कमी मिळायचे. मात्र, नंतर डोसच्या लशींची संख्या वाढायला लागली आणि लसीकरणाचा टक्काही वाढला. आजमितीला राज्यात 10 हजार लसीकरण केंद्र आहेत. त्यापैकी 90 टक्के केंद्र ही सरकारी तर 10 टक्के केंद्र ही खासगी आहेत. या सर्व केंद्रांवर दररोज सरासरी 7 ते 8 लाख जणांना लशीचा डोस मिळतो. त्यामध्ये 18 व त्यापुढील नागरिकांच्या लसीकरणाची संख्या अधिक आहे.

शिवछत्रपती पुरस्कार रखडले नियमांच्या बंधनात

आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाइन वर्कर यांची संख्या कमी झाली आहे. आतापर्यंत राज्यात 11 कोटी 19 लाख जणांचे लसीकरण झाले आहे. त्यापैकी 12 लाख 94 हजार आरोग्य कर्मचारी यांना पहिला तर 11 लाख 41 हजार जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. तसेच 21 लाख 47 हजार फ्रंटलाइन वर्कर यांना पहिला तर, 18 लाख 98 हजार जणांना दुसरा डोस मिळाला आहे.

Omicron : ओमिक्राॅन व्हेरियंटसंदर्भात WHO ने शेअर केली नवी माहिती

18 ते 40 वयोगटातील लाभार्थ्यांची संख्या जास्त आहे. यामध्ये 4 कोटी 7 लाख जणांना पहिला तर 1 कोटी 74 लाख जणांना दुसरा डोस मिळाला आहे. तर 45 व त्यापुढील वयोगटातील 2 कोटी 89 लाख जणांना पहिला तर 1 कोटी 81 लाख जणांना दुसरा डोस मिळाला आहे.
महाराष्ट्रात लसीकरणात मुंबई प्रथम क्रमांकावर असून, आतापर्यंत येथे 1 कोटी 60 लाख 56 हजार लसीकरण झालेले आहे. पुणे दुसऱ्या क्रमांकावर असून, येथे 1 कोटी 30 लाख डोस देण्यात आले आहेत. तिसऱ्या क्रमांकावर ठाणे असून तेथे 93 लाख 67 हजार डोस देण्यात आले आहेत. चौथ्या क्रमांकावर नाशिकमध्ये 54 लाख 8 हजार आणि पाचव्या क्रमांकावर नागपूरमध्ये 51 लाख 57 हजार इतके लसीकरण झालेले आहे.

राता लंबिया : टांझानियातील भाऊ-बहिणीच्या व्हिडिओने धुमाकूळ (video)

Back to top button