नाशिक : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कंटेनर चालकाविरोधात गुन्हा | पुढारी

नाशिक : एकाच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याने कंटेनर चालकाविरोधात गुन्हा

नाशिक : रस्त्याच्या मधोमध कंटेनर उभा करून एकाच्या अपघाती मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी कंटेनर चालकाविरोधात आडगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.१६) सकाळी ११.३० च्या सुमारास नववा मैल येथे कंटेनरवर आदळून भुपेश नागो मगर यांचा मृत्यू झाला तर पंकज प्रविण मगर गंभीर जखमी झाले.

पोलिसांनी तपास केला असता एमएच ४६ बीएफ ७१२७ क्रमांकाच्या कंटेनर चालकाने पार्किंग लाईट न लावता रस्त्याच्या मधोमध कंटेनर उभा केला होता. त्यामुळे भुपेश यांचा अपघाती मृत्यू झाला. याप्रकरणी आडगाव पोलिस तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

Back to top button