गेल्या ९ वर्षात काय काय विकले ते सांगावे, छगन भुजबळांची भाजपच्या अभियानावर टीका | पुढारी

गेल्या ९ वर्षात काय काय विकले ते सांगावे, छगन भुजबळांची भाजपच्या अभियानावर टीका

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

निवडणूका जवळ आल्याने भाजपचे मोदी @9 महाजनसंपर्क अभियान सुरु आहे. लवकरच महापालिका स्थानिक स्वराज्य संस्था तसेच इतर निवडणूका लागतील. या अभियानाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने गेल्या ९ वर्षात काय काय विकले ते सांगावे, या काळात किती नोकऱ्या दिल्या तसेच १५ लाख रुपये देणार होते त्याचे काय झाले हे सर्व या अभियानाच्या माध्यमातून भाजपच्या नेत्यांनी सांगायला हवे, जेणेकरुन लोकांचा अभ्यास चांगला होईल, अशी टीका माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

शरद पवार यांच्या पंतप्रधान पदाबाबत बोलताना, पवार साहेबांचे पंतप्रधानपद अगदी जवळून गेले होते. ते एकमेव आहेत की जे त्या पदाला लायक आहे. त्यांचा वेगवेगळ्या क्षेत्रात, प्रशासन चालविण्याबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. आज सुद्धा त्यांच्या इतका अभ्यास असणारा कोणी दुसरा नेता देशात आहे, असे मला वाटत नाही.

जाहीरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कलगीतुरा लागलेला आहे, असे करायला नको. पहील्या दिवशीच्या जाहीरातीतून भाजप गायब तर दुसऱ्या दिवशी भाजपचे नेते गायब असे व्हायला नको. हे कोण करतंय माहीत नाही पण यामुळे कामे होत नाही आणि कार्यकर्ते दुखावले जात आहेत आहे. फेव्हिकॉलचा जोड जरी असला तरी हा जोड खरा पाहीजे, नाहीतर हे जोड तुटतात अशी कोपरखळी देखिल भुजबळांनी या‌वेळी मारली.

आदीवासी विभागाचे कंत्राटी कर्मचारी आता मुंबईकडे जाताना मला दिसले. हे फार चुकीचे आहे. कंत्राटी म्हणून काय झाले काम तर करत आहेत ना. विभागाने असे करायला नको. जर १५ वर्षे ते काम करु शकतात तर यापुढे देखिल करतील. असे अचानक त्यांना कामावरुन काढून टाकणे योग्य नाही. त्यांचे कुटुंबाचा तरी विचार व्हायला हवा, असे भुजबळ यांनी यावेळी सांगितले.

हेही वाचा : 

Back to top button