पिंपरी : बेशिस्त आरोग्य निरीक्षकाला आयुक्तांनी दाखवला घरचा रस्ता | पुढारी

पिंपरी : बेशिस्त आरोग्य निरीक्षकाला आयुक्तांनी दाखवला घरचा रस्ता

पिंपरी(पुणे); पुढारी वृत्तसेवा : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आरोग्य निरीक्षक सुनील वाटाडे हे फ क्षेत्रीय कार्यालयाच्या आरोग्य विभागात कार्यरत होते. मात्र, बेशिस्तपणे वागत असल्याने, गैरवर्तन करीत असल्याने त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तरीही कामात व वर्तनात सुधारणा न झाल्याने वाटाडे यांना सेवेतून निलंबित केले आहे. विभागीय चौकशी करण्याचे आदेश आयुक्त शेखर सिंह यांनी शुक्रवारी (दि.15) दिले आहेत.

आरोग्य निरीक्षक वाटाडे हे कामावर वेळेवर उपस्थित राहत नव्हते. वरिष्ठांना न विचारता निघून जाणे, विनापरवाना गैरहजर राहणे, बैठकांना गैरहजर राहणे, अशा प्रकारे कामात हलगर्जीपणा केल्याने त्यांच्यावर वेळोवेळी दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. मात्र, त्यांच्या वर्तनात कोणतीही सुधारणा झाली नसल्याने विभागप्रमुखांनी त्यांचे निलंबन करण्याचे शिफारस आयुक्तांकडे केली होती.
त्यानुसार, महापालिका अधिनियमातील कलम 56 (1) व 56 (2) फ नुसार व महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम 1979 च्या नियम 4 (1) (अ)चे अंतर्गत वाटाडे याचे निलंबन करण्याचे आदेश आयुक्तांनी दिले आहे.

हेही वाचा

वडगाव मावळ : कृषी विभागाची खरीप हंगाम तयारी जोरात

मोशी : बनकरवस्तीत गटाराचे पाणी रस्त्यावर

Ashadhi wari 2023 : आठ बैलजोड्यांच्या मदतीने रोटी घाट पार

Back to top button