नाशिक : बॅनर लावत असताना पडून एकाचा मृत्यू | पुढारी

नाशिक : बॅनर लावत असताना पडून एकाचा मृत्यू

नाशिक : इमारतीवरून पडल्याने कामगार ठार झाल्याचा प्रकार मुंबईनाका परिसरात घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अजय पंढरीनाथ पवार (२५, रा. आयटीआय सिग्नल, सातपूर) हे नवजीवन इमारतीवर बॅनर लावत असताना पाय घसरून खाली ज‌मिनीवर पडले. जखमी अजयला उपचारासाठी खासगी रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. या प्रकरणी मुंबईनाका पोलिसांत अकस्मात मृत्यू नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा : 

Back to top button