Nashik APMC Election Live Update : महिला राखीव गटातून कल्पना चुंभळे, सविता तुंगार विजयी | पुढारी

Nashik APMC Election Live Update : महिला राखीव गटातून कल्पना चुंभळे, सविता तुंगार विजयी

नाशिक (पंचवटी) : पुढारी वृत्तसेवा

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठीची मतदान प्रक्रिया सुरू असून सहकारी संस्था मतदार संघातून महिला राखीव गटातून चुंभळे गटाचे कल्पना चुंभळे तर पिंगळे गटाच्या सविता तुंगार विजयी झाल्या आहे. पिंगळे गटाचा आतापर्यंत १५ पैकी ५ तर चुंभळे गटाचे ३ जागांवर विजय झाला आहे.

महिला राखीव गटातून चुंभळे गटाचे कल्पना चुंभळे यांना ७१४ तर पिंगळे गटाच्या सविता तुंगार यांना ७१३ व शोभा माळोदे यांना ५५६ तर विजया कांडेकर यांना ५३३ मते मिळाली.

महिला राखीव गटात एकूण २७४३ मतदान झाले, तर २७१६ वैध मतदान झाले. यात २७ अवैध मते आढळली.
महिला राखीव गटाची फेर मत मोजणीची मागणी पराभूत उमेदवार शोभा माळोदे यांनी केली आहे.

महिला राखीव गटाची फेर मत मोजणीची मागणी पराभूत उमेदवार शोभा माळोदे यांनी केली आहे.

सहकारी संस्था मतदार संघातून चुंभळे गटाची विजयाला सुरूवात

प्रल्हाद काकड, धनाजी पाटील विजयी

सहकारी संस्था मतदार संघातून चुंभळे गटाचे भटके विमुक्तमधून प्रल्हाद काकड तर इतर मागास प्रवर्ग गटातून मधून धनाजी पाटील विजयी झाले आहे. पिंगळे गटाचा आतापर्यंत १५ पैकी ४ तर चुंभळे गटाचे २ जागांवर विजय झाला आहे.

चुंभळे गटाचे भटके विमुक्त गटामधून प्रल्हाद काकड यांना ७०१ तर विश्वास नागरे यांना ५२१ मते मिळाली. प्रल्हाद काकड हे मतांनी विजयी झाले. तसेच इतर मागास प्रवर्ग गटातून मधून दिलीप थेटे यांना ६११ तर धनाजी पाटील यांना ६१३ मते मिळाली. धनाजी पाटील हे १ मतांनी विजयी झाले आहे. यात फेर मत मोजणी करण्यात आली. मतमोजणी नंतर दोन मतांनी तर फेर मतमोजणी नंतर एक मताने धनाजी पाटील विजयी झाले.

भटके विमुक्त गटात एकूण १२६२ मतदान झाले, तर १२२२ वैध मतदान झाले. यात ४० अवैध मते आढळली.

तर मागास प्रवर्ग गटातून एकूण एकूण १२६१ मतदान झाले, तर १२२४ वैध मतदान झाले. यात ३७ अवैध मते आढळली.

आता पर्यंत पिंगळे गटाने यापूर्वी बिनविरोध तीन व मत मोजणीनंतर आतापर्यंत पंधरा पैकी चार जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे पिंगळे गटाच्या एकुण संचालकांचा आकडा सात झाला आहे. तर चुंभळे गटाचे २ जागांवर विजय झाला आहे.

……………………………………….

आता पर्यंत पिंगळे गटाने यापूर्वी बिनविरोध तीन व मत मोजणीनंतर आतापर्यंत पंधरा पैकी पाच जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे पिंगळे गटाच्या एकुण संचालकांचा आकडा आठ झाला आहे. तर चुंभळे गटाचे तीन जागांवर विजय झाला आहे.

फेर मतमोजणी सुरु

पिंगळे गटाचे विनायक माळेकर, जगन्नाथ कटाळे विजयी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठीची मतदान प्रक्रिया सुरू असुन ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वसाधारण गटातून पिंगळे गटाच्या विनायक माळेकर, जगन्नाथ कटाळे विजयी झाले आहे.

पिंगळे गटाचे विनायक माळेकर ९९२ तर जगन्नाथ कटाळे ९५६ तसेच चुंभळे गटाच्या तानाजी गायकर ८९५, प्रकाश भोये ६७८ मते मिळाली आहे. तर अपक्ष सोमनाथ जाधव १९ तर राजाराम धात्रक यांना ११ मते मिळाली. या गटात एकूण ३६७२ मतदान झाले, तर ३५५१ वैध मतदान झाले. यात १२१ अवैध मते आढळली. यामुळे पिंगळे गटाने यापूर्वी बिनविरोध तीन व मत मोजणीनंतर आतापर्यंत पंधरा पैकी चार जागांवर विजय मिळवला आहे. यामुळे पिंगळे गटाच्या एकुण संचालकांचा आकडा सात झाला आहे.

पिंगळे गटाच्या निर्मला कड विजयी

नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालक मंडळासाठीची मतदान प्रक्रिया सुरू असून ग्रामपंचायत मतदार संघातील आर्थिक दुर्बल गटातून पिंगळे गटाच्या निर्मला कड १८० मतांनी विजयी झाल्या आहे. निर्मला कड यांना ९९९ तर चुंभळे गटाच्या सदानंद नवले यांना ८१९ मते मिळाली. या गटात एकूण २००० मतदान झाले, तर १८१८ वैध मतदान झाले. यात १८२ अवैध मते आढळली. यामुळे पिंगळे गटाने आतापर्यंत पंधरा पैकी दोन जागांवर विजय मिळवला आहे.

पिंगळे गटाचे भास्कर गावित विजयी 

संपूर्ण नाशिक जिल्ह्याचं लक्ष लागून असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळासाठीच्या मतदान प्रक्रियेला सकाळी आठ वाजता जिल्हाधिकारी कार्यालय आवरात सुरूवात झाली. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी १८ जागांकरिता होत असलेल्या निवडणुकीत तीन जागा बिनविरोध झाल्या असल्याने उर्वरित १५ जागांसाठी ३७ उमेदवारांसाठीची शनिवार (दि. २९) रोजी मतदान मोजणी प्रक्रियेला शांततेत आणि चोख पोलीस बंदोबस्तात सुरूवात झाली आहे.

यात पिंगळेंच्या आपलं पॅनलचे ग्रामपंचायत मतदार संघातील अनुसुचित जमाती गटातून भास्कर गावित २४९ मताधिक्याने विजयी झाले आहे. यात भास्कर गावित यांना ८९९ तर चुंभळे गटाच्या यमुना जाधव यांना ६५० मते मिळाली. तर अपक्ष अलका झोमन यांना २४१ मते मिळाली. या गटात एकूण २००० मतदान झाले तर वैध मते १७९० झाली. यात २१० अवैध मते आढळली.

हेही वाचा :

Back to top button