MannKiBaat100 : ‘नॅशनल कॉन्क्लेव्ह : मन की बात@100’ मधील विशेष निमंत्रित महिलेची कार्यक्रमादरम्यान प्रसूती | पुढारी

MannKiBaat100 : 'नॅशनल कॉन्क्लेव्ह : मन की बात@100' मधील विशेष निमंत्रित महिलेची कार्यक्रमादरम्यान प्रसूती

पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आकाशवाणीवर प्रसारित होणारी ‘मन की बात’ ३० एप्रिल रोजी संवादाचा शतकोत्सव पूर्ण करत असून यानिमित्त दिल्लीत ‘नॅशनल कॉन्क्लेव्ह: मन की बात@100’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात एका गर्भवती महिलेलाही आमंत्रित करण्यात आले होते. कार्यक्रमादरम्यान तिला प्रसूती वेदना होत होत्या, तिने बाळाला जन्म दिला आहे.

कार्यक्रमातील 100 विशेष निमंत्रितांपैकी पूनम देवी यांना कार्यक्रमादरम्यान प्रसूतीच्या वेदना होत होत्या. त्यांना डॉ. राम मनोहर लोहिया हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे त्यांनी बाळाला जन्म दिला. मन की बात कार्यक्रमाच्या एका भागामध्ये पीएम मोदींनी उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथील एका छोट्या गावात राहणाऱ्या पूनम देवी यांचा उल्लेख केला आहे. पूनम देवी एका बचत गटाच्या सदस्या आहेत. मुलाच्या जन्मानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले की, अशा खास दिवशी त्यांच्या कुटुंबातील नवीन सदस्याचे आगमन झाल्याने त्यांना खूप आनंद होत आहे.

पूनम देवी या बचत गट लखीमपूर खेरीमध्ये हँडबॅग, चटई आणि इतर वस्तू बनवण्याचे काम करतात. हा एक अनोखा उपक्रम आहे जो खेड्यातील महिलांसाठी केवळ उत्पन्नाचा अतिरिक्त स्रोतच प्रदान करत नाही तर कचरा कमी करण्यासाठी आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी देखील योगदान देतो. त्यांच्या संस्थेच्या या उपक्रमाला परिसरातील अनेक बचत गटांनी मोठ्या प्रमाणावर स्वीकारले आहे.

मन की बातचे 100 भाग पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाचे उद्घाटन उपाध्यक्ष जगदीप धनखर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय माहिती, प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर उपस्थित होते.

हेही वाचा : 

Back to top button