‘पूर्वी आणि आताही भाजपचे गटनेते म्हणून भगत बालाणीच आहेत’ | पुढारी

'पूर्वी आणि आताही भाजपचे गटनेते म्हणून भगत बालाणीच आहेत’

जळगाव; पुढारी वृत्तसेवा :

ज्यांनी भाजपचे घर सोडले आहे त्यांनी आता तरी खुल्लम-खुल्ला शिवसेनेचे नगरसेवक असल्याचे सांगावे. पूर्वी आणि आता देखील भाजपचे गटनेते भगत बालाणी आहेत. असे विशेष सभा तहकूब झाल्‍यानंतर बालाणी हे माध्यमांशी बोलत होते.

महापालिकेत आज विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. मात्र भाजपच्या नगरसेवकांनी ही विशेष महासभा बेकायदेशीर असल्याचे म्हटले. या मागणीमुळे ही सभा तहकूब करण्यात आली.

बालाणी म्हणाले-

बालाणी म्हणाले- स्वीकृत सदस्य किंवा कोणत्याही विषयाला आमचा विरोध नव्हता. मात्र ही सभा बेकायदेशीर होती. महापौर आदल्या दिवशी सर्व पक्षाच्या गटनेत्यांना बोलवून नाव मागवितात. मात्र आम्हाला पाचारण करण्यात आले नाही. या गोष्टीला मी विरोध केला. म्हणून सभा तहकूब करावी. ही मागणी आम्ही लावून धरली. ही संपूर्ण सभा बेकायदेशीर होती. कारण माहितीच्या अधिकारात आयुक्तांकडे माहिती मागितली असता त्यात भाजपचे गटनेते म्हणून भगत बालाणी यांचेच नाव आहे. त्यामुळे ही सभा बेकायदेशीर होती असे ते म्हणाले.

बालाणी यांनी शिवसेनेचे नगरसेवक नितीन लढ्ढा व महापौरांचे आभार मानले. भविष्यात सर्व विषय नियमित घेतील, अशी अपेक्षा बालाणी यांनी व्यक्त केली.

विशेष महासभेमध्ये कोणताच गोंधळ घातला नाही. नियमानुसार विषय मांडले. ते विषय लावून धरले तर ते महापौरांना गोंधळ वाटत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहेत. असेही बालाणी म्हणाले. भाजपचे पूर्वी व आताचे गटनेते म्हणून बालाणीच आहेत, असे ते म्हणाले.

हेही वाचलं का? 

Back to top button