जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे बंद, उर्वरीत १० दरवाजे दोन-तीन दिवसात बंद हाेण्याची शक्यता - पुढारी

जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे बंद, उर्वरीत १० दरवाजे दोन-तीन दिवसात बंद हाेण्याची शक्यता

पैठण; पुढारी वृत्तसेवा :

जायकवाडी धरण पूर्ण क्षमतेने भरले.  धरणातून येणारी पाण्याची आवक लक्षात घेता जिल्हा प्रशासन व पाटबंधारे विभागाने मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सोडला होता. तेरा दिवसांपूर्वी २७ दरवाजांपैकी १८ दरवाजातून गोदावरी नदीमध्ये हा विसर्ग सोडला होता. परंतु, मंगळवारी येथील धरणात जमा होणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे उघडण्यात आलेले १८ दरवाजापैकी आठ दरवाजे बंद करण्यात आले आहेत. उर्वरीत दहा दरवाजे येत्या दोन-तीन दिवसात बंद करण्याची शक्यता व्यक्त हाेत आहे.

दहा दरवाजे अर्धा फूट उघडे ठेवले. ५ हजार २४० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी नदीमध्ये सुरू आहे. १८ हजार ००१ क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात सुरू असलेले दरवाजे पूर्ण बंद होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

तेराव्या दिवशी मंगळवारी रात्री येथील जायकवाडी धरणात येणाऱ्या पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे गोदावरी नदीत विसर्ग करण्यासाठी सुरू असलेले १८ दरवाजांपैकी आठ बंद करण्यात आले. दहा दरवाजे अर्धा फूट उघडे ठेवून ५ हजार २४० क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरी सुरू आहे.

सध्या या धरणात २१६६. १५९ दलघमी पाणीसाठा उपलब्ध आहे. ९९.७८ टक्के पाणीसाठा ठेवण्यात आला. वरील धरणातून १८ हजार ००१ क्युसेक पाण्याचा आवक येत आहे. वरील धरणातून पाण्याची आवक कमी झाली. त्यामुळे उघडे ठेवण्यात आलेले दहा दरवाजे येत्या दोन-तीन दिवसात बंद करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

हेदेखील वाचा-

Back to top button