नाशिक : विहिरीचे खोदकाम करताना भीषण स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर | पुढारी

नाशिक : विहिरीचे खोदकाम करताना भीषण स्फोट; तीन कामगारांचा मृत्यू, एक गंभीर

त्र्यंबकेश्वर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा 

नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यात विहिरीचे खोदकाम करत असताना भीषण दुर्घटना घडली आहे. तालुक्यातील हिरडी या गावात मंगळवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास एका विहीरीचे खोदकाम सुरू होते. स्फोट घडवून विहीर खोदली जात होती. मात्र, यावेळी अचानक झालेल्या स्फोटामुळे विहिरीत असलेल्या तीन कामगारांचा मृत्यू झाला आहे. तर १ कामगार गंभीर जखमी झाला आहे.

हे कामगार बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, या घटनेची माहिती तत्काळ पोलिसांना कळविण्यात आली. त्यानंतर रुग्णवाहिकेसह पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. यानंतर गंभीर जखमी कामगाराला नाशिक येथील शासकिय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तसेच याप्रकरणी हरसुल पोलिस अधिक तपास करीत आहेत.

या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये लहू जालिंदर महाजन (३९), आबा पिनू एकनाथ बोराडे (३६) आणि बिभीषण शामराव जगताप (४०) यांचा समावेश आहे. या तिघांचे मृतदेह नाशिक जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आज सकाळीच आणण्यात आले आहेत.

हेही वाचा : 

Back to top button