Snowfall in Himachal Prades : हिमाचल प्रदेश, मनालीत बर्फवृष्टी; देवभूमीत पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा | पुढारी

Snowfall in Himachal Prades : हिमाचल प्रदेश, मनालीत बर्फवृष्टी; देवभूमीत पुढचे दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा

पुढारी ऑनलाईन: हिमाचलप्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी (Snowfall in Himachal Pradesh) सुरू असल्याचे वृत्त एएनआयने दिले आहे. दरम्यान, मनालीतील रोहतांग बोगद्यावर देखील मोठ्या प्रमाणात बर्फवृष्टी सुरू असून, येथील टेकड्या बर्फाच्या पांढर्‍या थराने झाकल्या गेल्या आहेत. याबाबत हवामान विभागाने यापूर्वीच इशारा दिला होता.  पुढचे दोन ते दिवस हिमाचल प्रदेशमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस, गारा पडणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे.

श्रीनगर हवामान केंद्राने देखील बुधवारी (दि.१९) राज्यातील काही भागात मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. २१ एप्रिलपर्यंत जम्मू काश्मीरचे हवामान बिघडण्याची शक्यता देखील विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. कुपवाडा, बारामुल्ला, गंदरबल, बांदीपोरा, झोजिला, सोनमर्ग, माछिल सेक्टर, फारकियान टॉप, राझदान पास, मीनमार्ग इत्यादी डोंगराळ भागात बर्फवृष्टी (Snowfall in Himachal Pradesh) झाली आहे, अशी माहिती येथील प्रशासनाने दिली आहे.

Snowfall in Himachal Pradesh: हवामान विभागाने दिला होता इशारा

पुढचे दोन ते तीन दिवस उत्तरेकडील हिमाचल प्रदेशमधील बहुतांश ठिकाणी गडगडाटासह वादळी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. राज्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस, गारा आणि सोसाट्याचा वारा येण्याची शक्यता आहे, अशी शक्यता येथील हवामान विभागाने वर्तवली होती.

हेही वाचा:

Back to top button