नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप | पुढारी

नाशिक : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्यास जन्मठेप

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत तिला गर्भवती करणाऱ्या युवकास जिल्हा न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. असिफअली अशरफअली सैयद (३०, रा. अरिंगळे मळा, नाशिकरोड) असे आरोपीचे नाव आहे. असिफअली याने अरिंगळे मळा येथे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करीत तिला गर्भवती केले होते.

एप्रिल २०२० मध्ये हा प्रकार उघडकीस आला. त्यानंतर पीडितेने नाशिकरोड पोलिस ठाण्यात पोक्सोसह बलात्काराची फिर्याद दाखल केली. तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक एम. बी. राऊत यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे ॲड. दीपशिखा भिडे यांनी युक्तिवाद केला. त्यांनी न्यायालयात सात साक्षीदार तपासले. त्यात परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. यु. कदम यांनी असिफअली यास जन्मठेप व दहा हजार रुपयांचा दंड, अशी शिक्षा सुनावली आहे. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस शिपाई एन. ए. वाघमारे, डी. एस. हासे, अंमलदार के. के. गायकवाड यांनी कामकाज पाहिले.

हेही वाचा :

Back to top button