नाशिक : आजी-आजोबांचा स्नेहमेळावा; सुरकुतलेले चेहरे गतस्मृतींनी उजाळले | पुढारी

नाशिक : आजी-आजोबांचा स्नेहमेळावा; सुरकुतलेले चेहरे गतस्मृतींनी उजाळले

नाशिक (वणी) : पुढारी वृत्तसेवा

वणी शहरात सर्वात प्रथम सुरू झालेली शाळा म्हणजे विकास विद्यालय आहे. या विद्यालयाची स्थापना १९५७ साली करण्यात आली होती. १९६६ च्या दरम्यान शिक्षण घेणारे सत्तरी ओलांडलेले असे आजी-आजोबा झालेल्या विद्यार्थांचा स्नेहमेळावा वणी येथील रामदेव महाराज मंदिर सभागृहात आनंदात पार पडला आणि सुरकुतलेले चेहरे भूतकाळातील आठवणींनी उजाळले.

५७ वर्षानंतर विकास विद्यालयाच्या विद्यार्थी यांचा स्नेहमेळावा भरल्याने सुरकुतलेल्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसुन आला. येथील विकास विद्यालयात १९६६ साली शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांनी तब्बल ५७ वर्षानंतर गत स्मृतीना उजाळा दिला. १९६६ साली वणी येथील देशपांडे वाड्यात विकास विद्यालयाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी केशवराव शंकरराव देशपांडे हे मुख्याध्यापक होते. शशिकांत दिक्षीत हे स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षपदी होते. दिक्षीत, पांडुरंग कोकाटे , देशपांडे हे व्यासपीठावर उपस्थित होते. प्रथमतः उपस्थित विद्यार्थी यांनी आपला परीचय करुन दिला. कौटुंबिक पार्श्वभूमी ,सदस्यांची माहीती ,वर्तमान स्थितीत कार्यरत क्षेत्र या संदर्भात माहीती दिली. विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या जेष्ठांनी शालेय जीवनातील बालपणाच्या गमती जमती सांगितल्या. शिस्त , गुणवत्ता ,मेहनत ,याबरोबर शारीरीक व मानसिक विकासा कडे शिक्षकवर्ग कटाक्षाने लक्ष देत .निखळ मनोरंजन करत असताना शैक्षणिक विकासाचा हेतु डोळ्यासमोर ठेवला जात असे,शिक्षण कालावधीतील अनुभवाचा वापर कौटुंबिक सदस्यांच्या मार्गदर्शनासाठी झाला. अनुभवाची शिदोरी याच्या आठवणी स्नेहमेळाव्याच्या माध्यमातुन ताज्या झाल्या, असे प्रतिपादन कार्यक्रमाचे अध्यक्ष शशिकांत दिक्षीत यांनी केले. शिक्षक शिकविताना संस्कार ,संस्कृती ,कुटुंबव्यवस्था ,सामाजीक ,जबाबदारी ,भविष्यकालीन हेतु याचा समन्वय साधत ,निरपेक्ष भावनेने विद्यार्थी यांना आपुलकीने व प्रेमाणे प्रसंगी कडक शिस्तीचा वापर करत शिकवत असे प्रतिपादन बी एम सुराणा यांनी केले.याप्रसंगी विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त केले .बालपणीच्या शालेय आठवणीना उजाळा देत स्मृती पुर्नजिवीत करताना अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. या कार्यक्रमाचे आयोजन गेल्या सहा महीन्यापासून करत असताना संपर्क करण्यासाठी अडचणी आल्या मात्र तरीही स्नेहमेळावा घ्यायचाच याच उद्देशाने कार्यक्रमाचे नियोजन आखण्यात आल्याची माहीती आयोजक विश्वनाथ मालाणी यांनी दिली. सोमनाथ भुतडा ,माणकलाल चोपडा ,भाऊसाहेब देशमुख ,बन्सीलाल चोपडा ,इंदरचंद बोरा ,कांतीलाल शर्मा ,सावळीराम शिरसाठ ,अनंता बच्छाव ,नंदकिशोर गांगुर्डे ,रामचन्द्र पेंढारी ,नारायण सोनार ,सुखलाल साखला ,रमणचंद बोथरा ,भास्कर वाटपाडे ,नभु मोकाट ,जगन्नाथ गायकवाड ,गयास शेख ,वाळु घुले ,लालाभाई शेख ,रामदास खांडे ,किसन बागुल ,नारायण गांगुर्डे ,रमण सुराणा ,संपतराव घडवजे ,भागीरथ शर्मा ,अमोल देशपांडे ,विमल रवळगे ,मंगला थोरात ,इंदिरा जोशी ,चन्द्रकला लाडे ,कुसुम क्षिरसागर ,सुशिला पाटी ,मालती शिंपी ,पुष्पा गवळी ,नलिनी देशमुख ,सुमन ताकाटे ,रजनी अहीरराव ,शैलजा शिंदे ,चन्द्रकला आहेर ,शिला माळवतकर ,सुशिला नागरे ,गुलाब सोनार , कचोलीया ,बन्सी सहाणे ,व विविध मान्यवर उपस्थित होते. स्नेहभोजनानंतर ज्येष्ठ विद्यार्थी यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद लुटला व एकमेकांना जड अंतकरणाने निरोप देत आपआपल्या शहराकडे मार्गक्रमण केले.

हेही वाचा:

Back to top button