Nashik : शिवसेनेतर्फे गोदावरीची महाआरती | पुढारी

Nashik : शिवसेनेतर्फे गोदावरीची महाआरती

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अयोध्या दौऱ्याचे औचित्य साधत शिवसेनेतर्फे रविवारी (दि. ९) सायंकाळी रामकुंड येथे गंगा गोदावरीचा महाआरती करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी केलेल्या ‘जय श्रीराम’च्या घोषाने अवघा परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.

शिवसेनेने मुख्यमंत्री शिंदे यांच्या नेतृत्वाखाली अयोध्या दौऱ्याचे आयोजन केले होते. ना. शिंदे यांनी अयोध्येत रामलल्लाचे दर्शन घेताना मंदिर उभारणीच्या कामाची पाहणी केली. सायंकाळी ६ ला त्यांनी शरयू नदीची महाआरती केली. नाशिकमधील शिवसैनिकांनी त्याचवेळी गोदावरी नदीची महाआरती केली. यावेळी अवघा गोदाघाट परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला.

याप्रसंगी सेनेचे उपजिल्हाप्रमुख सुदाम डेमसे, श्यामकुमार साबळे, दिगंबर मोगरे, माजी नगरसेविका संगीता जाधव, युवासेना जिल्हा विस्तारक योगेश बेलदार, युवासेना जिल्हाप्रमुख रुपेश पालकर, अंबादास जाधव, युवासेना महानगरप्रमुख दिगंबर नाडे, भारतीय विद्यार्थिसेना जिल्हाप्रमुख किरण फडोळ, मध्य नाशिक विधानसभाप्रमुख रोशन शिंदे, उपमहानगरप्रमुख आनंद फरताळे, युवासेना जिल्हा चिटणीस आदित्य बोरस्ते, युवासेना जिल्हा समन्वयक राहुल वारुळे, वैद्यकीय आघाडी जिल्हाप्रमुख योगेश मस्के यांच्यासह पदाधिकारी व शिवसैनिक माेठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button